My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

सारखे ढेकर येण्याची कारणे व सतत ढेकर येणे यावर घरगुती उपाय

 

सारखे ढेकर येण्याची कारणे व सतत ढेकर येणे यावर घरगुती उपाय



सतत ढेकर येणे – Excessive belching :

ढेकर येण्याची अनेक कारणे असू शकतात. जेवल्यानंतर दोन ते तीन वेळा ढेकर येणे ही अगदी समान्य बाब आहे. मात्र सारखे ढेकर येत असेल तर ते काळजीचे कारण ठरू शकते. त्यामुळे सतत ढेकर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. ढेकर येणे याला english मध्ये burping किंवा belching असे म्हणतात.

प्रामुख्याने पचनास जड पदार्थ खाल्यामुळे होणारे अपचन, ऍसिडिटी, गॅसेस किंवा पोटफुगी यांमुळे पोटात गॅस आणि हवा साचून राहते आणि ती ढेकरच्या रुपात थोडीथोडी बाहेर पडते. अशावेळी जोपर्यंत पोटातील गॅस किंवा हवा पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत सतत ढेकर येतच राहतात.

सतत ढेकर येण्याची कारणे ही आहेत –

  • पचनास जड पदार्थ खाल्यामुळे म्हणजे तेलकट, मसालेदार पदार्थ किंवा मांसाहार खाल्यामुळे त्याचे व्यवस्थित पचन न झाल्याने वारंवार ढेकर येऊ शकतात.
  • पोटात गॅस झाल्यामुळे, पोटफुगी झाल्यामुळेही सतत ढेकर येऊ शकतात.
  • अपचन, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता सारखे पोटाचे विकार झाल्यामुळेही सतत ढेकर येण्याची शक्यता आहे.
  • घाईघाईने जेवल्यामुळे, अन्न व्यवस्थित न चावता गिळल्यामुळे पोटात हवा अधिक प्रमाणात जाते. त्यामुळेही पोटफुगी होऊन अन्नपचनास बाधा येऊन पचनमार्गात ती हवा अडकून राहते. अशावेळी सतत ढेकर येऊन त्या माध्यमातून ती हवा बाहेर पडत असते.
  • पित्ताशयाचे आजार, पित्ताशयात खडे असल्यासही सतत ढेकर येत असतात.
  • तसेच काही वेदनाशामक औषधे किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स यासारखी औषधे घेत असल्यामुळेही सतत ढेकर येऊ शकतात.

सारखे ढेकर येत असल्यास हे करा घरगुती उपाय :

कधीकधी पोट हे गॅस आणि हवेने तुडुंब भरलेले असते आणि ढेकरही येत नाहीत. अशावेळी खूप अस्वस्थ वाटते यासाठी खाली काही उपयुक्त उपाय दिले आहेत त्यामुळे पोटातील गॅस आणि हवा ढेकरच्या माध्यमातून लवकर निघून जाईल व सतत येणारे ढेकरही थांबतील.

ओवा आणि सैंधव मीठ –
एक चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खावे यामुळे पोटातील गॅस ढेकर येऊन निघून जाण्यास मदत होते. जेवणानंतर पोटात गॅस होऊन सतत ढेकर येत असल्यास रोज जेवल्यानंतर ओवा आणि सैंधव मीठ खावे.

आले आणि लिंबू रस –
एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून पिण्यामुळे पोटातील गॅस, हवा ढेकर येऊन निघून जाण्यास मदत होते. यामुळे घेतलेल्या आहाराचे पचनही व्यवस्थित होते.

आले व सैंधव मीठ –
आल्याचा तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्यास पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. अपचनही दूर होऊन अन्न व्यवस्थित पचते.

लसूण –
जेवणानंतर दोन लसूण पाकळ्या चावून खाल्यामुळेही पोटफुगी दूर होते व सतत येणारे ढेकरही कमी होतात.

वारंवार ढेकर येत असल्यास असा घ्यावा आहार :

काय खावे..?
जेवणानंतर सतत ढेकर होत असल्यास पचनास हलका असा आहार घ्यावा. ‎वरण-भातातून तूप घालून खावे. आयुर्वेदिक हिंग्वाष्टक चूर्ण गरम भातातून तूप घालून खाल्यास अपचन, गॅसेस, पोटफुगी ह्या समस्या दूर होतात. तसेच हिरव्या पालेभाज्यां, ताजी फळे, फळभाज्या, दही, ताक यांचा आहारात समावेश करावा.

काय खाऊ नये..?
जेवणानंतर सतत ढेकर होत असल्यास पचनास जड पदार्थ खाणे टाळावे. तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे तसेच चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणेही टाळावे.

जेवणानंतर सतत ढेकर येऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

  • एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. यापेक्षा दिवसभरात 3 ते चार वेळा थोडे थोडे जेवावे.
  • वेळेवर जेवण घ्यावे.
  • जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावा. ‎
  • गडबडीत, पटपट खाणे टाळावे. घाईघाईने जेवल्यामुळे हवा पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटफुगी होऊन सतत ढेकर येत असतात.
  • जेवणानंतर लगेच झोपू नये. तसेच दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये.
  • वारंवार चहा कॉफी पिणे टाळावे.
  • तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत. ‎
  • नियमित व्यायाम करावा. मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी योग वा रीलॅक्सेशन थेरपीचा अवलंब करावा.
  • सतत ढेकर येत असल्यास घरगुती उपायांनी त्रास कमी न झाल्यास आपल्या डॉक्टरकडून तपासणी व उपचार घ्यावेत.

Post a Comment

0 Comments