My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

Corona new Omicron variant : करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची ‘ही’ भयंकर लक्षणं घेऊ नका हलक्यात, या लोकांना आहे सर्वाधिक धोका!

 Corona new Omicron variant : करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची ‘ही’ भयंकर लक्षणं घेऊ नका हलक्यात, या लोकांना आहे सर्वाधिक धोका!

Omicron 

कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराने लोकांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा नवीन प्रकार व्हायरसच्या वर्तनातच बदल करतो. या प्रकारामुळे दक्षिण आफ्रिकेसह भारतीय लोकांची चिंता वाढली आहे. हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप धोकादायक आहे. संसर्गाची तीव्रता निश्चित करण्यासाठी जगभरातील तांत्रिक सल्लागार गट या नवीन प्रकारावर सतत लक्ष ठेऊन आहेत. 

कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांनी या नवीन प्रकारामुळे कोविड-19 या आजाराच्या रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे उघड केली आहेत. वेळीच त्याची लक्षणे जाणून घ्या आणि काळजी घेण्यास सुरूवात करा असा सल्ला त्यांनी दिला आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतून B.1.1.529 या प्रकाराबाबत प्रथमच WHO ला कळवण्यात आलं होतं.


ओमायक्रॉनची लक्षणे काय आहेत?

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, त्याच्या लक्षणांमध्ये जास्त थकवा, सौम्य स्नायूदुखी, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला यांचा समावेश होतो. तर काही प्रकरणांमध्ये फक्त सौम्य उच्च ताप दिसून येतो. त्यांनी उघड केले आहे की रूग्ण हॉस्पिटलमध्ये भरती न होता पूर्ण बरा होण्यास सक्षम आहे. तुम्हाला माहित आहे का त्यांनी गेल्या 10 दिवसांत अपरिचित लक्षणं असलेल्या 30 हून अधिक कोविड-19 रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यांनी सांगितले की ओमायक्रॉनच्या रुग्णाची लक्षणे करोनाच्या डेल्टा या प्रकारापेक्षा खूपच वेगळी आहेत.

👉ओमायक्रोन व्हेरियंटची ही 3 प्रमुख वैशिष्ट्ये👈

डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ओमायक्रोन व्हेरिएंटची लक्षणे पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा वेगळी असू शकतात. ओमायक्रोनच्या मुख्य लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी या रुग्णांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. याशिवाय काही रुग्णांमध्ये अशक्तपणाच्या तक्रारीही आढळून आल्या आहेत. 

ते पुढे की, आतापर्यंत एकाही रुग्णाने वास कमी होणं, चव कमी होणं, नाक जाम होणं आणि जास्त ताप येणे अशा तक्रारी नोंदवल्या नाहीत.


या वयातील लोकांना संक्रमित करत आहे हा व्हेरिएंट

कोएत्झी म्हणतात की हा ओमायक्रॉन हा प्रकार 40 किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांना संक्रमित करत आहे. ओमायक्रॉनची लक्षणे दिसून येणा-या निम्म्या लोकांचे लसीकरण झालेलेच नाही. त्या म्हणतात की बहुतेक लोकांना एक ते दोन दिवस तीव्र थकवा जाणवत आहेत. यासोबतच लोकांना डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास जाणवू लागला आहे.

ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

कोविड-19 च्या या नव्या प्रकारापासून वाचण्यासाठी तज्ज्ञ अजूनही लसीकरणावर जोर देत आहेत. ते म्हणतात की हा नवीन संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिंग राखा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी चांगले व्हेंटिलेशन आहे की नाही याची खात्री करा. याव्यतिरिक्त नियमितपणे हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता आहे. ओमायक्रॉन या प्रकाराची भीती जगभर पसरली आहे. लसीकरण केलं असलं तरीही त्याची लक्षणे वेळीच ओळखून खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

ओमायक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक, तज्ज्ञांचा दावा

एएनआयच्या वृत्तानुसार, ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.' असंही त्या म्हणाल्या.

ओमायक्रॉनची तपासणी कशी केली जाते?

करोनाच्या ओमिक्रॉन या प्रकाराच्या तपासणीबाबत सांगताना WHO नं सांगितलं की, सध्या SARS-CoV-2 PCR हा व्हेरिएंट पकडण्यात सक्षम आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.

Post a Comment

0 Comments