My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

ताप का येतो ?

तापाचे मुख्य प्रकार तीन आहेत



सतत राहणारा ताप

सतत ताप म्हणजे आजाराच्या काळात अजिबात न उतरता कायम राहिलेला ताप. हा ताप विषमज्वर, कावीळ  वगैरे आजारांमध्ये आढळतो.


कमीजास्त होणारा ताप

आजाराच्या काळात एकदम चढणारा व एकदम पूर्णपणे (किंवा अर्धवट) उतरणारा ताप माहिती विचारून ओळखता येतो. थंडीताप याच प्रकारात येतो. यात आधी थंडी वाजते मग ताप येतो. मलेरिया, न्यूमोनिया,मूत्रपिंडाचा जंतुदोष, किंवा कोठेही पू  असल्यास असा  ताप दिसून येतो.


मुरलेला ताप

हे नाव चुकून पडले आहे. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. मात्र आधुनिक उपचारांमुळे याचे प्रमाण आता पुष्कळ कमी झाले आहे.


ताप का येतो ?

शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते. या लढाईतून निघणा-या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो.


ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे. राग आल्याशिवाय जशी लढाई होत नाही तशी तापाशिवाय जंतूंशी लढाई होत नाही. बारीक ताप असेल तर ताप उतरवण्याची आवश्यकता नसते. मात्र ताप जास्त असेल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांना तापामुळे कधीकधी झटके येऊ शकतात. ताप किती आहे याबरोबरच कसा आहे हेही पाहणे महत्त्वाचे आहे.



तापावर उपचार

साधारण किंवा मध्यम ताप असेल तर केवळ कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो.

  • ऍस्पिरिन आणि पॅमाल ही औषधे तापावर गुणकारी आहेत. ऍस्पिरिनमुळे पोटात जळजळ होते. म्हणून आधी काही तरी थोडे खाऊन मगच ते घ्यावे. पॅमालने पोटात जळजळ होत नाही. लहान मुले व गरोदर स्त्रियांकरता पॅमालच वापरावे.
  • ताप हे केवळ लक्षण आहे. मूळ आजारावर उपचार होणे आवश्यक आहे.


ताप आणि आयुर्वेद


तापाच्या अनेक अवस्था असतात. ताप सुरु होत असताना भूक कमी होते. त्यावरून प्रौढांसाठी लंघन हा प्रथम महत्त्वाचा उपचार ठरतो.

रोगनिदान नेमके असल्यास तापासाठी वेगळा योग्य उपचार असतोच. ताप असताना गोदंती मिश्रण (गोदंती व जहर मोहरा पिष्टी) 200 ते 300 मि ग्रॅ. दिवसातून 3-4 वेळा देणे उपयोगी ठरते. ताप उतरताच या पुडया थांबवाव्यात. थंडी भरून ठरावीक वेळाने मधून मधून येणारा ताप असतो. अशा वेळी काढेचिराईत उपयोगी आहे. या गोळयांनी थंडीताप आटोक्यात येतो.

अनेकदा इतर उपचारांनी जोरदार ताप नियंत्रित होतो, पण काहीजणांना 99 अंशाच्या आसपासचा ताप सतत राहतो. त्या वेळी गुडुचिघनवटी, संशमतीवटी ह्या 64 मि.ग्रॅ. च्या चार ते आठ गोळया 3-4 वेळा वापराव्यात. याने अंगात मुरलेल्या जुनाट तापाचे तीन चार दिवसांत निराकरण होते.

जुनाट ज्वरात त्वचेला, शरीराला कोरडेपणा येतो. अशा अवस्थेत कडू औषधाची तुपे उपयोगी पडतात. तित्तक तूप 15-20 मि.ली. ह्या प्रमाणात, सकाळी रिकाम्या पोटी चार ते सहा दिवस द्यावे.

ताप हे सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे रोगलक्षण आहे.

Post a Comment

0 Comments