My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

नगर शहरात 'या' खाजगी हॉस्पिटल्समध्ये करोना लसीकरणास परवानगी

 नगर शहरात 'या' खाजगी हॉस्पिटल्समध्ये करोना लसीकरणास परवानगी

अ.नगर मनपा हद्दीमध्‍ये मा.शासनाच्‍या निर्देशानुसार खाजगी कोवीड लसीकरण केंद्रास शहरातील आठ रूग्‍णालयांना परवानगी -  मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे


  मा.शासनाच्‍या निर्देशानुसार खाजगी कोवीड लसीकरण केंद्रास शहरातील आठ रूग्‍णालयांना परवानगी देण्‍यात आलेली आहे. सदर लस ही कंपनीकडून संबंधीत हॉस्‍पीटल यांना शासनाने ठरवून दिलेल्‍या दरामध्‍ये खरेदी करून सदर लसीचे शुल्‍क नागरिकांनाकडून आकारून लस देण्‍यात येईल. तसेच लसीकरण         करणा-यांचा अहवाल खाजगी रूग्‍णालय यांनी मनपाकडे वेळोवेळी देणे बंधनकारक आहे. तरी नागरिकांनी सहशुल्‍क लसीकरणाचा लाभ घ्‍यावा व कोवीड पासून स्‍वत:ला व आपल्‍या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी अहवान केले.

 खाजगी रूग्‍णालयास कोवीड लसीकरण करणे बाबतचे मनपा मार्फत खालील रूग्‍णालयांना लस देणेबाबतचे प्रमाणपत्र मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी दिले. यावेळी आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष डॉ.श्री.सागर बोरूडे, नगरसेवक मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.गणेश कवडे, माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम, वैद्यकिय आरोग्‍याधिकारी डॉ.श्री.सतिष राजूरकर, श्री.राजू नराल,श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते.


      यावेळी आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष डॉ.श्री.सागर बोरूडे यांनी सांगितले की, मनपा मार्फत आरोग्‍य केंद्रामध्‍ये लसीकरण सुरू असून नागरिक लसीकरणासाठी गर्दी करतात काही नागरिक वयस्‍कर असतात  मा.शासनाच्‍या निर्देशानुसार आठ ठिकाणी लसीकरण केंद्रास परवानगी दिलेली आहे. त्‍याचा लाभ नागरिकांनी घेण्‍यात यावा. त्‍यानुसार खालील हॉस्‍पीटलची नांवे दिलेली आहेत.

1) मॅक्‍सकेअर हॉस्‍पीटल, सावेडी


2) सिध्‍दीविनायक हॉस्‍पीटल, टिळक रोड


3) सिनारे हॉस्‍पीटल, नागापूर


4) लाईफ लाईन हॉस्‍पीटल , तारकपूर


5) वहाडणे हॉस्‍पीटल, लालटाकी,


6) पाटील हॉस्‍पीटल, कोठी, स्‍टेशन रोड


7) हराळ हॉस्‍पीटल, कल्‍याण रोड


8) जयश्री नर्सिग होम , चाणक्‍य चौक

Post a Comment

0 Comments