My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

किडनी फेल होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

 किडनी खराब होणे – Kidney failure :

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.

मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.

दोनपैकी एक किडनी निकामी झाल्यास किंवा अन्य कारणामुळे शरीरातील एक किडनी काढल्यास त्या स्थितीला किडनी फेल्युअर म्हणता येणार नाही. साधारणपणे जेव्हा रुग्णाची एक किडनी पुर्णपणे खराब होते तेव्हा दुसरी किडनी ही दोन्ही किडन्याचे काम करते. मात्र जेव्हा दोन्हीही किडन्या फेल होतात तेव्हा त्या स्थितीस किडनी फेल्युअर असे म्हणतात.

किडनी खराब झाल्याची लक्षणे – Symptoms of kidney failure :

• भूक कमी होणे.
• ‎वारंवार लघवीस होणे.
• ‎लघवी करताना त्रास होणे, लघवीस जळजळणे.
• ‎मळमळणे, उलट्या होणे.
• ‎चेहऱ्यावर सूज येणे.
• ‎हाय ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढतो.
• ‎रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे.
• ‎कंबर दुखणे.
• ‎पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

किडनी फेल्युअरचे प्रकार – Types of kidney failure :

किडनी फेल्युअरचे दोन मुख्य प्रकार आहेत.
(1) ऍक्युट किडनी फेल्युअर
(2) क्रोनिक किडनी फेल्युअर

(1) ऍक्युट किडनी फेल्युअर
या प्रकारास Acute Renal Failure (ARF) असेही म्हणतात. कोणत्याही इतर आजाराच्या दुष्परिणामांमुळे, जेंव्हा किडन्या काही काळ काम करीत नाहीत तेंव्हा त्या स्थितीला ऍक्युट किडनी फेल्युअर असे म्हणतात.
त्या संबंधित आजारावर उपचार केल्यास, शरीरातील किडन्या पूर्वीप्रमाणे आपले काम करु लागतात आणि रुग्णास किडनीचे कार्य सुधारण्यासाठी पुढे कोणतीही विशेष औषधे घेण्याची आवश्यकता नसते.
तर काही रुग्णांना ऍक्युट किडनी फेल्युअरमध्ये काही काळ डायलिसिस घेण्याचीही आवश्यकता पडू शकते.

(2) क्रोनिक किडनी फेल्युअर
या प्रकारास Chronic Kidney Disease (CKD) किंवा Chronic Renal Failure (CRF) असेही म्हणतात. क्रोनिक किडनी फेल्युअर अनेक प्रकारच्या रोगांमुळे किडणीची कार्यक्षमता क्रमशः महिन्यात किंवा वर्षामध्ये कमी होऊ लागते आणि दोन्ही कीडन्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात. क्रोनिक किडनी फेल्युअर ठीक करण्यासाठी, किडनीचे कार्य सुधारण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. क्रोनिक किडनी फेल्युअरमध्ये स्थिती गंभीर झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करण्याचा मार्ग निवडावा लागतो.

किडनी निकामी होण्याची कारणे – Kidney failure causes :

क्रॉनिक किडनी फेल्युअर होण्यासाठी मधुमेह (डायबेटीस) आणि हाय ब्लडप्रेशर ही दोन प्रमुख कारणे ठरत आहेत.
• अनियंत्रित मधुमेह आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास क्रोनिक किडनी फेल्युअर होण्याचा धोका जास्त असतो.
• किडणीला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात बाधा निर्माण झाल्यामुळे किडनी फेल होऊ शकते.
• ‎किडणीतील मूतखड्यामुळेही किडनी फेल्युअर होऊ शकते.
• ‎क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचा आजार असल्यास. यामध्ये चेहरा आणि हातांवर सूज येते दोन्ही कीडन्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात.
• इन्फेक्शनमुळे,
• ‎रासायनिक खते, किटकनाशके युक्त आहार, अन्नभेसळ, आहारात वापरली जाणारी रंगे यांमुळे आपल्या किडनीवर घातक परिणाम होतो.
• ‎मद्यपान, धुम्रपान व्यसन करणाऱ्यांनाही किडनी फेल होण्याचा धोका अधिक असतो.
• ‎काही अँटिबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे (पेनकिलर्स) यांच्या अतिवापरामुळे किडनी फेल्युअर होण्याचा धोका असतो.

किडणीतील मूतखड्यामुळेही किडनी फेल होऊ शकते. मूतखड्यामुळे मूत्राच्या मार्गात अडसर निर्माण होतो व त्यामुळे किडन्या फुगतात, किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. मूतखड्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. 

किडनी फेल झाल्याचे असे करतात निदान :

किडनी फेल्युअरसंबंधित लक्षणे दिसून आल्यास किडनीचे कार्य तपासण्यासाठी आपले डॉक्टर खालील तपासण्या करायला सांगतील.
ब्लड टेस्ट – रक्त तपासणी करून रक्तातील क्रिएटिनिन आणि यूरियाचे प्रमाण तपासले जाते.
Creatinineची नॉर्मल लेव्हल ही 0.6 mg/dl ते 1.2 mg/dl पर्यंत आहे तर Serum Ureaची नॉर्मल लेव्हल 15 ते 40 mg/dl पर्यंत असते. क्रिएटिनिन आणि यूरियाचे प्रमाण ह्यापेक्षा जास्त असल्यास किडनी फेल्युअरचे निदान होते.
याशिवाय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासणे, लघवीची तपासणी, किडणीची सोनोग्राफी तपासणी केली जाते.

किडनी खराब झाल्यावर काय होते..?

आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम किडनी करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे किडनी खराब झाल्यावर अपायकारक घटक बाहेर टाकले जात नाहीत. त्यामुळे अशा अपायकारक घटकांची आपल्या रक्तात वाढ होऊ लागते. त्यामुळे याचा परिणाम एकूणच आरोग्यावर होऊ लागतो.

किडनी खराब झाल्यास हे करतात उपचार – kidney failure treatments :

उच्च रक्तदाब किंवा मधुमेहामुळे किडनी खराब झाली असल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना केली जाते. तसेच रुग्णाच्या स्थितीनुसार किडनी निकामी झाल्यावर डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे उपचार केले जातात.

डायलिसिस (Dialysis) –
क्रोनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये नियमित डायलिसिस करावे लागते. जेव्हा दोन्ही किडण्या निकामी होतात अशा वेळी रक्तात आणि शरीरात साठलेल्या अनावश्यक विषारी घटकांना मशीनद्वारे कृत्रिमरित्या शरीरातून बाहेर टाकले जाते या पध्द्तीला डायलिसिस असे म्हणतात.

किडणी प्रत्यारोपण (Kidney Transplant) –
दोन्ही किडन्या निकामी झाल्यास आणि औषधांचा उपयोग होत नसल्यास तसेच नियमित डायलिसिसची (Dialysis) गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी किडणी प्रत्यारोपण केले जाते. किडणी प्रत्यारोपण (Kidney Transplant) म्हणजे कुटुंबातील अन्य सदस्याची किंवा मृत व्यक्तितील एक किडनी रुग्णामध्ये ऑपरेशनद्वारे बसवली जाते.
किडणी प्रत्यारोपण केल्यावर रुग्ण तसेच किडनी देणारी व्यक्तीही निरोगी आयुष्य जगू शकते. रुग्णास डायलिसिस करण्याची गरज राहत नाही.

किडनी फेल झाल्यावर असा घ्यावा आहार :

किडनी फेल्युअरच्या रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक असते. त्यांना आहारातील सोडियम (मीठ), पोटॅशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनचे प्रमाण कमी करावे लागते.

एका दिवसात सोडिअम आणि पोटॅशियमचे प्रमाण 2000 mg पेक्षा कमी असावे. यासाठी खारट पदार्थ खाणे टाळावे. आहारात मिठाचा वापर कमी करावा. तसेच लोणची, पापड, चिप्स, स्नॅक्स असले खारट पदार्थ खाणे टाळावे.

किडनी फेल होऊ नये म्हणून हे करावे उपाय – Kidney failure Precautions tips :

किडनी फेल होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.
• भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक.
• ‎लघवीला झाल्यास त्वरित लघवीस जावे. लघवीला होऊनही लघवी थांबवुन ठेवल्याने मुत्राशय, किडनीवर प्रचंड ताण येतो. याचा वाईट परिणाम किडणीच्या कार्यावर होतो.
• ‎किडनीचा आजार टाळण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचे आहे.
• ‎उच्च रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवा. क्रोनिक किडनी फेल्युअरच्या कारणापैकी मधुमेह व हाय ब्लडप्रेशर हे प्रमुख कारण ठरत आहेत. किडनी फेल्युअरच्या शंभर रुग्णांमध्ये सुमारे 40 व्यक्ती ह्या मधुमेही रुग्ण असतात.
• ‎पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. कुळथीचे कढण प्या, शहाळाचे पाणी प्या.
• ‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. दररोज 4 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका. आहारातील मिठावर लक्ष ठेवाचं शिवाय वेफर्स, स्नॅक्स, बिस्किटे, वडापाव यातील मिठावर (सोडिअमवर) लक्षसुद्धा ठेवा.
• ‎सेंद्रिय शेतीतून पिकलेला भाजीपाला खाण्यास प्राधान्य द्या. कोबी, फ्लॉवर खाणे टाळा. फळे-भाजीपाला स्वच्छ धुवूुनचं मग खावीत. कारण ह्यांवर भरपूर प्रमाणात किटकनाशके फवारतात.
• ‎डॉक्टरांच्या सल्याशिवाय परस्पर वेदनाशामक अौषधे (पेनकिलर्स) घेणे टाळा.
• ‎आणि हेल्थ चेकअप वेळी आपल्या किडनीचीही तपासणी करून घ्या.

Post a Comment

0 Comments