गर्भात बाळाचा मृत्यू होऊ नये व जन्मत: कोणता आजार जडू नये म्हणून प्रेग्नेंसीत करा ‘या’ ब्लड टेस्ट!
important blood tests in pregnancy :- प्रेग्नेंसीच्या पहिल्या म्हणजेच सुरूवातीच्या ३ महिन्यांमध्ये स्त्रियांना खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर एका छोट्याश्या बेजबाबदारपणामुळे गर्भपात होण्याचा धोका प्रचंड वाढतो.
गर्भात बाळाचा मृत्यू होऊ नये व जन्मत: कोणता आजार जडू नये म्हणून प्रेग्नेंसीत करा ‘या’ ब्लड टेस्ट!

आयर्न आणि ब्लड शुगर लेव्हल

हिमोग्लोबिन तपासण्यासाठी ही ब्लड टेस्ट केली जाते ज्यामुळे ओळखता येतं की शरीरात आयर्न अर्थात लोहाची कमतरता आहे की नाही. गरोदरपणाच्या काळात शरीरात पुरेशा प्रमाणात लोह असणे गरजेचे आहे ज्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन मिळू शकेल. ब्लड टेस्टमुळे लोहाची कमतरता असल्यास ती दिसून येते आणि डॉक्टर ही कमतरता भरून काढण्यासाठी आयर्न सप्लीमेंट सुद्धा देतात. याशिवाय ब्लड टेस्टच्या सहाय्याने रक्तातील साखरेची मात्रा अर्थात ब्लड शुगर सुद्धा तपासली जाते. यामुळे जेस्टेनेशनल डायबेटीज बद्दल सुद्धा कळते.
हेपीटायटीज बी आणि एचआयव्ही

ब्लड टेस्टच्या मदतीने डॉक्टर हेपीटायटीजचा सुद्धा शोध लावू शकतात. जर गरोदर स्त्रीला हेपीटायटीज असेल तर त्यामुळे बाळाच्या लिव्हरला मोठे नुकसान पोहचू शकते. अशा स्थितीमध्ये डॉक्टर गरोदर स्त्रीला अँटीबॉडीचे इंजेक्शन देतात. सर्व गरोदर स्त्रियांनी एचआयव्ही आणि एड्सची टेस्ट सुद्धा आवर्जून करायला हवी. जर आईला एचआयव्ही किंवा एड्सची असेल तर वेळीच उपचार घेऊन तो आजार बाळाला होऊ नये म्हणून प्रयत्न करता येतात आणि बाळाला सुरक्षित राखता येते.
थायरॉइड आणि रुबेला टेस्ट

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये डॉक्टर थायरॉइडच्या लेव्हलची तपासणी करतात. जर गरोदर स्त्रीला हाइपोथायरॉइड किंवा हाइपरथायरॉइडची समस्या असेल तर गरोदरपणाच्या काळात आईवर लक्ष ठेवले जाते जेणेकरून बाळाच्या विकासावर कोणताही परिणाम होऊ नये. याशिवाय गरोदर स्त्रीने रुबेलाची टेस्ट सुद्धा आवर्जून करायला हवी. जर गरोदर स्त्रीला रुबेलाचा आजार झाला तर बाळाचे हृदय, डोळे आणि ऐकण्याची क्षमता यांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे बाळाला या समस्यांपासून सुरक्षित राखायचे असेल तर या टेस्ट आवर्जून करा.
इतर ब्लड टेस्ट

सिकेल सेल डीजीज किंवा थेलीसिमियाची टेस्ट सुद्धा गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात केली पाहिजे. सिकेल सेल डिस्ऑर्डर आणि थेलीसिमिया दोन प्रकारच्या रक्त पेशींची निगडीत विकार आहे ज्यामुळे ऐनिमियाचा आजार सुद्धा होऊ शकतो आणि त्याचा गंभीर परिणाम बाळाला भोगावा लागू शकतो. याशिवाय टोक्सोप्लास्मोसिस इंफेक्शन सुद्धा पहिल्या तिमाहीमध्ये आई मार्फत बाळापर्यंत पोहचू शकते. याशिवाय बाळाच्या कोणत्याही अवयवात अपंगत्व येऊ शकते. यामुळे मिसकॅरेज वा स्टीलबर्थचा धोका सुद्धा बळावतो. गरोदरपणात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. यामुळे बाळाच्या वाढीमध्ये सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. आईला सुद्धा प्रीक्लेंप्सियाचा धोका उद्भवू शकतो. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये व्हिटॅमिन डीची लेव्हल चेक करण्यासाठी ही टेस्ट सुद्धा अवश्य करावी.
या गोष्टी लक्षात ठेवा

ब्लड टेस्ट करण्यासोबत स्त्रीने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्यांचे पालन केले तर बाळामध्ये जन्मजात आजार अथवा विकार उद्भवण्याची शक्यता अतिशय कमी होते. स्त्रीने गरोदरपणात वेळेवर लसीकरण करावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपली औषधे वेळेवर घ्यावीत. बाळाला आवश्यक गोष्टी जेवढ्या वेळेत मिळतील तेवढे बाळ निरोगी राहील आणि त्याला जन्मदोषाचा धोका होणार नाही. सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे स्त्रीने व्यसनमुक्त आयुष्य स्वीकारायला हवे एका निरीक्षणात हे दिसून आले होते की धुम्रपान, मद्यपान यांना आहारी गेलेल्या गरोदर स्त्रियांच्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जन्मदोष होतो. याशिवाय गरोदरपणात स्त्रीने आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे. स्त्रीचा आहार जितका चांगला असेल तेवढे बाळाचे आरोग्य चांगले राहील. कधी कधी चुकीचा आहार घेतल्याने किंवा चुकीचा पदार्थ खाल्ल्याने सुद्धा बाळामध्ये जन्मदोष निर्माण होतो. तर या काही गोष्टींची काळजी घेऊन गरोदर स्त्री आपल्या बाळाला जन्मदोषापासून वाचवू शकते आणि त्याला चांगले आयुष्य देऊ शकते.
MY LABORATORY
https://chetanlaboratory.blogspot.com/?m=1
1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील.
2) आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर किंवा घरी आणून दिला जाईल .
📲Contact No :- 9284585661 ( Chetan Dhus)
💊🩺🧬💉
TEST NAME
1. CBC 2. BSL (R)
3. Blood Group
4. HIV
5.Australia Antigen (Aust-Anti)
6.Bleeding Time & Clotting Time (BT-CT)
7.VDRL
8.Urine
ALL PREGNANCY TEST PRCE 800RS ONLY
External blood test ( बाह्य रक्त चाचणी )
TEST NAME TEST PRICE
1.TFT (Thyroid function tests) 300
2.TORCH test
3.Urine culture for bacteria 400
4.TSH (Thyroid-stimulating hormone) 200
2.TORCH test
3.Urine culture for bacteria 400
4.TSH (Thyroid-stimulating hormone) 200
0 Comments