My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Chikungunya in Marathi

 

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Chikungunya in Marathi

चिकनगुनिया आजार – Chikungunya :

चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, त्वचेवर पुरळ उटणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात.

Chikungunya in Marathi information

चिकनगुनिया होण्याची कारणे –

Causes of Chikungunya in Marathi

जेंव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या जातीच्या डासाची मादी एखाद्या व्यक्तीस चावते त्यावेळी त्या डासातील विषाणू हे त्या व्यक्तीच्या शरीरात पसरतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अशाप्रकारे चिकनगुनियाची लागण होत असते.

चिकनगुनिया संसर्गजन्य आहे का..?

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांद्वारे मनुष्यांना होत असतो. हा आजार चिकनगुनियाच्या विषाणूने (CHIKV) बाधित असणाऱ्या डासांमर्फत होत असतो. चिकनगुनिया हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. तो केवळ CHIKV बाधित डास चावल्यानेचं होत असतो. चिकनगुनिया झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्या खोकला किंवा शिंकातून चिकनगुनिया रोग पसरत नाही. त्यामुळे चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून तो संसर्गजन्य आजार (साथीचा रोग) नाही.

चिकुनगुनिया रोगाची लक्षणे – Chikungunya symptoms in Marathi :

चिकनगुनियाचा डास चावल्यानंतर साधारणपणे 3 ते 7 दिवसानंतर लक्षणे जाणवू लागतात.

  • भरपुर ताप येणे, (104 अंश पेक्षा अधिक ताप येणे.)
  • ‎हुडहुडी भरणे, थंडी वाजुन येणे,
  • ‎सांध्यांच्या ठिकाणी अतिशय वेदना होणे,
  • सांध्यांवर सूज येणे,
  • डोकेदुखी,
  • अंगदुखी,
  • ‎उलट्या व मळमळणे होणे,
  • ‎हातापयावर, पाठीवर पुरळ येणे अशी लक्षणे चिकनगुनिया आजारात जाणवू शकतात.

चिकुनगुन्याचे निदान असे केले जाते :

केवळ रक्ताच्या चाचणीद्वारेचं चिकुनगुनियाचे निदान करता येते. यासाठी ELISA ही रक्त चाचणी करुन चिकनगुनिया आजाराचे निदान केले जाते. याशिवाय CBC Test, RT-PCR test सुद्धा केली जाते.

चिकनगुनिया आजारावर असे उपचार करतात –

Treatment of Chikungunya in Marathi

चिकनगुनियावर विशिष्ट अशी औषधे उपलब्ध नाहीत. पेशंटमध्ये असणाऱ्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. चिकनगुनियामध्ये ताप व सांधेदुखी होत असते. अशावेळी पेरासिटामॉल सारखी वेदनाशामक औषधे दिली जातात. केवळ आपल्या डॉक्टरांनी दिलेलीच औषधे घ्यावीत.

तसेच रुग्णाने बेडरेस्ट घेणे आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सलाईन, ओआरएस, तरल द्रवपदार्थ घेणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे चिकनगुनिया झालेल्या रुग्णाला डास चावू नये, याची अधिक काळजी घ्यावी. जेणेकरुन इतर लोकांना या आजाराचा संसर्ग होणार नाही.

बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार दोन आठवड्यात पुर्णपणे बरा होत असतो. काही वृद्ध व्यक्तीमध्ये आजार बरा होण्यासाठी तीन महिने लागू शकतात. तसेच बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये आणखी काही दिवस सांधेदुखी होत राहते.

चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना :

Chikungunya prevention in Marathi

चिकनगुनियापासून बचाव करण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय खाली दिलेले आहेत.

  • डासांपासून बचाव करावा.
  • डासनाशक साधनांचा वापर करावा.
  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
  • घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.
  • ‎ चिकनगुनिया पसरवणारे डास हे प्रामुख्याने सकाळच्या व दुपारच्या वेळी फिरत असतात. याकाळात डासनाशक औषधांचा वापर करावा.
  • घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
  • घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत होईल.
  • ताप येणे, सांधे दुखणे असे त्रास असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि रक्त परिक्षण करुन घ्यावे.
  • ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नये.

Post a Comment

0 Comments