My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

सर्दी होण्याची कारणे व सर्दीवर हे करा घरगुती उपाय

 

सर्दी होण्याची कारणे व सर्दीवर हे करा घरगुती उपाय



सर्दी होणे – Common cold :

सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो.

सर्दी होण्याची कारणे – Common cold causes :

साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. सर्दी हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्दी झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकातून दुसऱ्या व्यक्तीला सर्दीची लागण होत असते. तसेच ऍलर्जी आणि बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळेही सर्दी होत असते.

तसेच सर्दीचा त्रास प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात होत असतो. थंडीत सकाळचा प्रवास करणे, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे यांमुळे सर्दी होत असते.

सर्दीची लक्षणे – Common cold symptoms :

• सर्दी झाल्यास नाक वाहणे,
• नाकातून पातळ किंवा घट्ट श्लेष्मल स्त्राव (शेंबूड) येणे,
• नाक चोंदणे,
• नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे,
• अंग दुखणे,
• डोकेदुखी,
• खोकला व ताप येणे अशी लक्षणे यामध्ये असतात.

सर्दीवर असे करतात उपचार – Common cold treatments :

संसर्गातून झालेली सर्दी पाच-सहा दिवसांत आपोआप बरी होत असते. सर्दीवर लक्षणानुसार उपचार केले जातात. सर्दी झाल्यास decongestants आणि antihistamine औषधे, वेदनाशामक गोळ्या दिल्या जातील. ताप किंवा खोकला असल्यास त्यासाठी औषधे दिली जातील.

सर्दी जर आठवड्यापेक्षा अधिक दिवस असल्यास आणि त्याबरोबरचं ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा खोकल्यातून रक्त येत असल्यास आपल्या डॉक्टरांना तात्काळ दाखवावे.

सर्दी कमी होण्यासाठी हे करा घरगुती उपाय – Common cold home remedies :

गरम दूध आणि हळद –
सर्दी पडसे झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे सर्दी कमी होण्यासाठी मदत होते.

आले –
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही सर्दी कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही कमी होतो. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.

तुळशीच्या पानांचा काढा –
एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा व मिश्रण चांगले उकळावे. हा आले आणि तुळशीचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा. हा उपाय जुनाट सर्दीवर खूप उपयोगी ठरतो.

लिंबू रस आणि मध –
लिंबूरसात व्हिटॅमिन-C मुबलक असल्याने सर्दी कमी ककरण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी चमचाभर लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. यामुळे सर्दीमुळे नाक गळणे कमी होते.

काळी मिरी, सुंठ आणि मध –
सर्दीमध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

सर्दी झाल्यावर असा घ्यावा आहार – Common cold diet plan :

सर्दी झाल्यास कोणता आहार घ्यावा, काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे.
• कोमट पाणी प्यावे.
• आले घालून चहा करून प्यावा.
• आहारात गरम चिकन किंवा मटण सूप जरूर प्यावे.
• ‎नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी ‘क’ जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं सेवन वाढवावे. यासाठी आवळा, लिंबू, संत्रे इत्यादी फळे खाऊ शकता.
• ‎आवळ्यापासून बनविलेले च्यवनप्राश हे आयुर्वेदिक औषध यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. च्यवनप्राशमुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढेल. त्यामुळे वरचेवर सर्दी होणार नाही.
• सर्दी झाल्यास फ्रीजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे.

सर्दी झाल्यास काय करावे, कोणती काळजी घ्यावी..?

• सर्दी झाल्यास दिवसभरात पुरेसे पाणी व तरल पदार्थ वरचेवर पित राहावे. यामुळे सर्दीमुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही.
• ‎पूर्णपणे विश्रांती घ्यावी.
• ‎थंड वातावरणापासून दूर राहावे.
• एसी व फॅनचा वापर करणे टाळावे.
• ‎उबदार कपडे वापरावेत.
• झोपताना उबदार पांघरूण घ्यावे.
• ‎शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची लागण होणार नाही.

Post a Comment

0 Comments