My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

कांजण्या आजार म्हणजे काय व कांजण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

 

कांजण्या आजार म्हणजे काय व कांजण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार



कांजिण्या – Chickenpox :

कांजिण्या हा विषाणूपासून होणार एक संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आजारास चिकनपॉक्स किंवा व्हॅरिसेला (varicella) या नावानेही ओळखले जाते. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात.


कांजिण्या कशामुळे होतो व कांजिण्याची कारणे – Chickenpox causes :

व्हॅरिसेला-झोस्टर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कांजिण्या आजाराचा संसर्ग होत असतो. 

कांजण्या रोग कसा पसरतो..?
कांजिण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. कांजिण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ, रुग्णाची दूषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडातील पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तिमध्येही कांजिण्याची लागण होऊन हा आजार पसरत असतो.

कांजिण्याची लक्षणे – Chickenpox Symptoms :

शरीरात व्हायरसची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारण 7 ते 21 दिवस लागू शकतात. अशावेळी सुरवातीला खालील लक्षणे चिकनपॉक्समध्ये जाणवू शकतात.
• ताप येणे,
• सर्दी व खोकला होणे,
• डोकेदुखी,
• भूक मंदावणे

वरील लक्षणे जाणवू लागल्यानंतर एक किंवा दोन दिवसात अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे पुरळ (फोड) येण्यास सुरवात होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खाज सुटत असते. त्यानंतर पुढील पाच ते सात दिवसात त्या पुरळात पाणी व पू धरतो. पुढे ते फोड फुटतात व त्याठिकाणी काळसर डाग दिसू लागतात. त्यानंतर काही दिवसात कांजिण्या आजार बरा होतो व त्वचेवर आलेले डागही नाहीसे होतात.

कांजण्यावर असा उपचार केला जातो – Chickenpox treatments :

कांजण्यावर लक्षणानुसार उपचार केले जातात. आपले डॉक्टर ताप आणि खोकला कमी करण्यासाठी औषधे देतील. याशिवाय पुरळावर जंतुनाशक क्रीम लावण्यासाठी देतील. तसेच अंगावरील खाज कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन औषधे किंवा मलहम दिले जाते. एक ते दोन आठवड्यात आजार बरा होतो.

कांजिण्याच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी :

• आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
• रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
• इतरांना याची लागण होऊ नये यासाठी काही दिवस कांजण्या झाल्यास मुलांना शाळेला पाठवून देऊ नये.
• मोठ्या व्यक्तींनीही कांजिण्या झाल्यास काही दिवस घरीच थांबावे.
• पुरळ डोळ्यांकडे पासरल्यास किंवा अधिक लालसर पुरळ दिसत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
• तसेच जर चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यासही डॉक्टरांकडे जावे.

कांजण्या झाल्यावर असा घ्यावा आहार – Chickenpox diet plan :

कांजिण्या झाल्यास काय खावे..?
मऊ वरणभात, उसळ, डाळ, दुधाचे पदार्थ, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, मांस, मासे यांचा आहारात समावेश करू शकता. सफरचंद, केळी, खरबूज अशी फळे व ब्रोकोली, पालक सारख्या भाज्याही आहारात असाव्यात. विशेषतः लोह घटक असणारे पदार्थ खाणे कांजिण्यामध्ये उपयुक्त असते.

डिहायड्रेशन होऊ नये पुरेसे द्रव पदार्थ पिणेही आवश्यक असते. यासाठी पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडरचे पाणी जरूर प्यावे.

कांजण्या झाल्यावर काय खाऊ नये..?
कांजिण्यामध्ये केवळ अंगावरचं नव्हे तर तोंडाच्या आतसुद्धा फोड येऊ शकतात. अशावेळी जास्त तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, लसूण खाण्यामुळे तोंडात जास्त त्रास होऊ शकतो. यासाठी तोंडात फोड आलेले असल्यास काही दिवस असे झणझणीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

याशिवाय द्राक्षे, अननस, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, लोणची, लसूण, जास्त खारट पदार्थ, कॉफी हे पदार्थ कांजण्या झाल्यावर खाऊ नयेत.

कांजण्या प्रतिबंधात्मक उपाययोजना :

कांजिण्याची लागण होऊ नये म्हणून काय करावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.
• लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
• कांजिण्या झालेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
• कांजिण्या असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
• ‎जन्मल्यापासून वयाच्या पंधरा वर्षापर्यंत कधीही कांजिण्या न झालेल्या व्यक्तींनी पुढे कांजिण्या आजार होऊ नये यासाठी कांजण्याची लस घ्यावी. मोठेपणी होणारा कांजिण्या आजार हा जास्त त्रासदायक असतो.

कांजिण्या आजार झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये या आजाराची रोगक्षमता निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना पुढे सहसा कांजिण्या आजार होत नाही. मात्र त्यांना नागीण (shingles) हा आजार होण्याची संभावना अधिक वाढते.

ज्यांना कांजण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात. या त्रासाला नागीण आजार असे म्हणतात.


कांजण्यांवर करा ‘हे’ घरगुती उपाय !

सुरुवातीस सतत ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे तसेच हलकेसे पॉट दुखणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे तीन चार दिवस दिसून येतात. त्वचेवर लाल रंगाची अत्यंत खाजवणारी वेदनादायी पुरळ, पुळ्या, फोड आलेले व्रण दिसायला लागतात. प्रथमतः पाठीवर, छातीवर, खांद्यावर व त्यांनंतर चेहरा, डोके व हातापायांवर व्रण येतात. हे फोड विभिन्नप्रकारचे असतात. अंगात ताप भरल्यानंतर फोड वाढतात. त्यानंतर फोड कोरडे पडतात. या त्रासदायी आजारावर मात करण्यासाठी घरगुती उपाय आहेत ते केल्याने त्रास नक्कीच कमी होईल.

१) बेकिंग सोडा 
कांजण्यांच्या डागांवर बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून लावल्याने आम्लता आणि क्षारता टिकून राहते त्यामुळे अंगावरची सूज आणि खाज दूर होते.


२) ओट्स
ओट्स मध्ये फायबर असल्याने लोक ओट्स खाणे जास्त पसंद करतात. परंतु हे ओट्स पाण्यात भिजू घालून डाग आलेल्या ठिकाणी लावल्यास डाग कमी होण्यास मदत होते.


३) मध
मध हे नैसर्गिकरित्या मॉइश्चराइजर असल्याने ते शरीरावर लावल्याने नवीन कोशिका बाहेर निघण्यास मदत होते त्याचबरोबर हे ओट्स सोबत लावल्यास डाग कमी होऊ शकतात.


४) पपई 
पपई पचनक्रियेस जेवढे उत्तम तेवढेच कांजण्यांच्या डागावर गुणकारी आहे. ब्राऊन शुगर आणि दुधात मिक्स करून लावल्याने आराम मिळतो.


५) नारळपाणी 
नारळपाण्यात खनिजे तसेच विविध व्हिटॅमिन्स असल्याने हे प्यायल्याने किंवा शरीरावर लावल्यानेही कांजण्यांचे डाग दूर होतात.

Post a Comment

0 Comments