My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

छातीत जळजळ होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

 

छातीत जळजळ होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय 



छातीत जळजळणे – Heartburn :

आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल.

जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. बहुसंख्य लोकांमध्ये छातीत जळजळणे हे एक सामान्य बाब असू शकते. तर साधारण 20-40% लोकांमध्ये गॅस्ट्रोइस्फॅगल रिफ्लक्स डिसीज (GERD) यामुळेही छातीत जळजळू शकते. ह्या स्थितीमध्ये जास्त काळजी घेणे आवश्यक असते.

छातीत जळजळ होण्याची कारणे :

  • ·         रात्री भरपेट जेवून तात्काळ झोपणे.

    ·         रात्री खूप उशिरा झोपणे.

    ·         बदलीच्या नोकऱ्यांमुळे पुरेशी झोप न होणे. अपुऱ्या झोपेमुळेही अ‍ॅसिडिटी बळावते.

    ·         मद्यपान करणे.

    ·         अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादी कारणांसाठी वेदनाशामक औषधे सातत्याने घेणे.

    ·         आहारात अतितेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही अ‍ॅसिडिटी वाढते.

    ·         अतिकडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थाच्या सेवनानेही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

    ·         शिळे अन्न खाल्ल्याने पोटातले आम्लपित्त वाढते आणि अपचन झाल्याने ढेकर येतात.

    ·         भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा आयुर्वेदाने सांगितलेला मूलमंत्र लक्षात ठेवावा. भुकेपेक्षा अधिक खाल्ल्यानेही आम्लपित्त वाढते आणि आंबट ढेकर येतात.

छातीत जळजळ होत असल्यास हे करा घरगुती आयुर्वेदिक उपाय :

आले –
छातीत जळजळत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे छातीतील जळजळ कमी होऊन आराम पडतो.

थंड दूध –
छातीत जळजळणे यावर थंड दूध पिणे उपयुक्त ठरते. तसेच दुधात मनुका घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात. छातीतील जळजळ दूर होते.

केळे –
केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे छातीमध्ये जळजळ होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो.

बडीशेप –
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे छातीत जळजळ होत नाही. तसेच यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.

तुळशीची पाने –
छातीत जळजळ होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत. यामुळे जळजळ थांबते.

छातीत जळजळत असल्यास लिंबूपाणी प्यावे की नाही..?

पित्तामुळे छातीत जळजळू लागल्यास अनेकजण लिंबाचा रस किंवा लिंबूपाणी पितात. मात्र अशावेळी लिंबूरस पिण्यामुळे पोटातील आम्ल अधिक वाढून त्रास वाढू शकतो. त्यामुळे छातीत जलन होत असल्यास लिंबूपाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

छातीमध्ये जळजळ होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

छातीत जळजळ होऊ नये यासाठी काय खावे, काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• एकावेळी भरपेट जेवणे टाळावे.
• जेवणाच्या वेळा पाळा.
• मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, कच्चा कांदा, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ हे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
• चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स वारंवार पिणे टाळा.
• मद्यपान, धूम्रपान, तंबाखू ही व्यसने करणे टाळा.
• पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
• नियमित व्यायाम करावा.
• मानसिक ताण घेऊ नये.
• रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
• डाव्या कुशीवर झोपावे.
• वारंवार वेदनाशामक गोळ्या खाणे टाळावे.

Post a Comment

0 Comments