My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान

 

चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान


चहा हा असा एक पेय आहे, जो खूप काळापासून चालत आलेला एक पेय आहे. हा पेय भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.
भारतातील सरासरी बघता ९०% लोक हे दिवसाची सुरवातच चहानी करतात.

काही लोक तर चहाचे इतके प्रेमी आहेत की, दिवसाला ३ ते ४ दा किव्हा त्यापेक्षा जास्त वेळ चहा घेतात. चहा तर आपल्या जीवनातील इतका महत्वाचा भाग झाला की, त्या शिवाय आपण राहूच शकत नाही. (आपण मध्ये मी पण आहेच. म्हणूनच तर आवडीने चहा बद्दल आर्टिकल लिहतोय. 😊)

उन्हाळा असो किंवा पावसाळा आपण चहा पिण्याचा एखादा बहाणा( कारण) शोधतोच!
शेवटी चहा ही चीज आहेच वेगळी….

चहा मध्ये कैफिन असून सुद्धा याच योग्य प्रमाणात सेवन केले, तर याचा शरीराला भरपूर लाभ होतो.

जर तुम्ही पण चहाचे प्रेमी(आशिक) असाल तर आज आपण चहा पिण्या बद्दल चे फायदे तसेच नुकसान जाणून घेऊया….!

  • चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो.
  • चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
  • चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
  • चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
  • चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढी चे नुकसाना पासून वाचवतो.
  • चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

  • गुळामध्ये पुष्कळ पोषक घटक असतात. दररोज गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  तुम्ही गुळ खात नसल्यास, गुळाचा चहा अवश्य प्या. 
  • गुळाचा चहा देखील आरोग्यासाठी एक अमृतच आहे. थंडीत गुळाचा चहा प्यायल्याने बरेच फायदे होतात.
  • तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गूळ अनेक रोगांमध्ये औषधापेक्षा चांगले कार्य करतो. गूळ लोहाने(आयर्न) भरलेले आहे आणि त्याचे गुणधर्म पण गरम आहे. 
  • ज्यामुळे डोके व पायापर्यंत अनेक रोगांमध्ये गुळाचा चहा खूप फायदेशीर असतो.  गुळाच्या चहामध्ये काही आयुर्वेदिक गोष्टी घालून ते औषधासारखे कार्य देखील करते.
  • गुळाचा चहा हा मेटाबॉलिज्म ला वाढवतो.
  • गुळाचा चाय हा कफनाशक असतो.

  • रक्ताची कमतरता असल्यास गुळाचा चहा प्यावा.

काळा चहा पिण्याचे फायदे

आपल्याला वाटतं असेल की, चहा फक्त झोप पळवायला किंवा ताजेपणा आणण्यासाठीच पितो. परंतु त्याच सोबत चहा नीट पित असल्यास त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदेही असतात.  दूध न घालता चहा पिल्यास फायटोकेमिकल्स, एंटीऑक्सीडेंट्स, फ्लोराइड्स, टेनिन्स सारखे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

काळ्या चहा मध्ये साखर न घालण्याचा किंवा कमी  घालण्याचा प्रयत्न करा. हे हृदयरोग, अतिसार, पाचक समस्या, उच्च रक्तदाब, टाइप २ मधुमेह आणि दम्याच्या आजाराविरूद्ध लढायला मदत करते.


काळ चहा पिण्याचे फायदे खालील प्रमाणे आहे:-

  • काळा चहा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
  • ब्लॅक टी(काळा चहा) च्या फायद्यांमध्ये हृदय निरोगी राहणे देखील समाविष्ट आहे.  एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) ने या संदर्भात बोस्टन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन कडून एक संशोधन आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केले आहे.  या संशोधनात असे मानले जाते की, ब्लॅक टीचे सेवन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोके मोठ्या प्रमाणात रोखू शकते.
  • काळा चहा मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त
  • तज्ञांच्या मते, ब्लॅक टीमध्ये थियाफ्लेविंस (theaflavins) नावाचे पॉलीफेनॉल असतात, ज्यावर अँटीडायबेटिक प्रभाव असतो. इंसुलिन वाढवून हे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
  • अमेरिकेतील एका संशोधन केंद्राने केलेल्या संशोधनानुसार ब्लॅक टीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. जर काळा चहा संतुलित आणि कमी चरबीयुक्त आहारा सोबत घेत असल्यास, कोलेस्ट्रॉल संतुलित असण्याचे परिणाम दिसून येतात.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवतो.
  • एका संशोधनानुसार, ब्लॅक टी मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे, काळा चहा आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्याच वेळी, संशोधन हे देखील सांगते की ब्लॅक टीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवरील प्रतिकारशक्तीच्या स्थितीवर अवलंबून असतो.
  • हाडांची ताकद वाढवते.
  • तज्ज्ञांच्या मते काळ्या चहाचे सेवन केल्यास वयानुसार हाडाच्या ज्या समस्या आहे, ते काळ्या चहाच्या सेवनाने दूर होण्यास मदत होते.
  • पाचक क्रियेसाठी उपयुक्त
  • कैटेचिन इंफ्लेमेटरी बाउल डिजीज या आतड्यांसंबंधी आजारामुळे पोटातले काही समस्या कमी करण्यास काळा चहा मदत करू शकते.
  • रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
  • संशोधनात असे आढळून आले की, ब्लॅक टीचा वापर वाढीव रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
  • डायरिया पासून आराम
  • ब्लॅक टीचा वापर दाहक आतड्यांसंबंधी आजारामुळे पोट संबंधित समस्या दूर करण्यात मदत करू शकतो.
  • तणावातून मुक्तता मिळते.
  • काळ्या चहाचा वापर तणावग्रस्त परिस्थितीत देखील फायदेशीर ठरू शकतो.  लंडन विद्यापीठाने या संदर्भात केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की चहा पिण्यामुळे  तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे

  • तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करतो. आणि तुळशी चहामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतो फक्त चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा.
  • तुळशीचा चहा प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी पॉवर वाढते आणि आजारांपासून आपला बचाव करतो
  • फ्लेवोनॉइड्स हे कँसर टाळण्यात मदत करतो.
  • अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला सॉफ्ट,शायनी आणि हेल्दी स्किन बनवण्यात मदत करतो.
  • तुळशी चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दमा टाळण्यात मदत करतात.
  • तुळशी चहामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असल्याकारणाने शरीराचे जॉइंट पेन टाळण्यात फायदेशीर असतात.
  • तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असतो. तुळशीचा चहा डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करतो.
  • तुळशीचा चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबिटीजपासून दूर ठेवण्यात आपली मदत करतो.
  • तुळशीचा चहा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतो. हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करतो.
  • तुळसीच्या चहामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात. जे शरीराला इंफेक्शन होऊ देत नाही.
  • तुळशीचा चहा प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.
  • तुळशीचा चहा प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होतो.

उपाशी पोटी चहा पिण्याचे नुकसान

  • तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असल्यास प्रोस्टेट कैंसर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. जो पुरुषांच्या मध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
  • तुम्ही उपाशी पोटी चहा घेत असाल तर तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते.
  • लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे.  रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होत.
  • चहामध्ये भरपूर टैनिन असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे कधीकधी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.

अति चहा पिण्याचे दुष्परिणाम (चहा चे दुष्परिणाम in marathi)

  • अति चहा पिणे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे.
  • अति चहाच्या सेवनाने आतड्यांवर परिणाम होतो.
  • जास्त प्रमाणात चहा पिण्यामुळे ऍसिडिटी होते.
  • जास्त चहा पिण्यामुळे निद्रानाश होतो.
  • अति चहा पिणे हा पोटाच्या आजारास कारणीभूत असू शकतो.
  • ब्लड प्रेशर वाढते.
  • अति चहा केलोस्ट्रोल वाढवतो.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…




Post a Comment

0 Comments