My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

जुलाब व अतिसार होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार

 

जुलाब व अतिसार होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार



जुलाब व अतिसार – Diarrhoea :

अतिसारमध्ये वारंवार पातळ शौचास होत असते. अतिसार ह्या आजारास डायरिया, हगवण लागणे किंवा जुलाब होणे असेही म्हणतात. अतिसारामध्ये वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे अशी लक्षणे असतात. अतिसाराचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोकाही संभवतो.

वारंवार जुलाब व अतिसार होण्याची कारणे – Diarrhoea causes

• अपचन झाल्यामुळे,
• उघड्यावरील दूषित आहार व दूषित पाण्यामुळे,
• बॅक्टरीयांच्या इन्फेक्शनमुळे जसे ई. कोलाई, सेलमोनेला, शिगेला, क्लोस्ट्रीडियम किंवा कॉलरा (विब्रियो कॉलेरी) जिवाणूंमुळे अतिसार होऊ शकतो.
• ‎व्हायरसमुळे (विषाणू संक्रमानामुळे) जसे की रोटावायरस, नोरोवायरस, एन्टेरोवायरस आणि हिपॅटायटीस व्हायरसमुळे अतिसार होऊ शकतो.
• पोटातील कृमी व जंतामुळे,
• कॉलरा, टायफॉईड, आमांश, डाईवर्टिकुलर डिजीज, इरिटेबल बोवेल सिंड्रोम अशा आतड्यासंबंधित विविध आजारामुळे,
• तसेच काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे जुलाब व अतिसार होऊ शकतो.

अतिसाराची लक्षणे – Diarrhea symptoms :

• वारंवार पातळ शौचास होणे,
• ‎शौच झाल्यावरही पुन्हा जाण्याची इच्छा होणे.
• पोटात दुखणे, मुरडा मारून वेदना होणे,
• मळमळ व उलट्या होणे,
• भूक मंदावणे,
• ‎शौचासोबत रक्त आणि आव पडणे.
• ‎वजन कमी होणे.
• ‎ताप, डोकेदुखी, भूक न लागणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणविणे.
• ‎लघवीचे प्रमाण कमी होऊन ती गडद रंगाची होणे.
ही लक्षणे अतिसारात जाणवितात.

अतिसाराचे प्रकार :

अतिसार आजाराचे तीन प्रमुख प्रकार करता येतील.
1) तीव्र पातळ अतिसार –
यात अनेक तास किंवा अनेक दिवस पातळ शौचास होते. या तीव्र प्रकारात एकाएकी पोटात कळ येते व बेंबीभोवती गुरगुर होऊन अस्वस्थता वाटते. तसेच, अतिसाराच्या तीव्रतेनुसार व कारणानुसार ताप येणे, अन्नाविषयी तिटकारा वाटणे, उलटी होणे, मळमळणे, अंग दुखणे, हातापायांत गोळे म्हणजे पेटके येणे इ. लक्षणेही आढळतात.

2) ‎तीव्र रक्तयुक्त अतिसार –
यात पातळ शौचाबरोबर रक्तही पडत असते. काही बालकांमध्ये अतिसारात शौचासोबत आव व रक्त जाणे ही लक्षणेही दिसतात.

3) ‎दीर्घकालिन अतिसार (क्रॉनिक) –
चौदा दिवसांहून अधिक काळ पातळ शौचास वारंवार होत असल्यास त्याला क्रॉनिक अतिसार असे म्हणतात.

अतिसार प्रतिबंधात्मक उपाय – Diarrhea prevention tips :

अतिसाराची लागण होऊ नये म्हणून काय करावे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• उकळवून गार केलेले स्वच्छ पाणी प्यावे.
• ‎जेवण योग्य पद्धतीने शिजवून योग्य पद्धतीने साठवून ठेवले पाहिजे.
• ‎भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
• ‎एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका असल्यास ते खाऊ नये.
• ‎आजारी व्यक्तीने जेवण तयार करू नये.
• ‎जेवण्याआधी तसेच बाथरुमला जाऊन आल्यानंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• ‎घरातील व आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता राखावी.

अतिसारवर असे करतात उपचार – Diarrhoea treatments :

अतिसारमध्ये वारंवार पातळ शौचास झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. यासाठी पुरेसे तरल पदार्थ रुग्णाला देणे आवश्यक असते. अधिक प्रमाणात अतिसार होत असल्यास सलाईन दिले जाते. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे अतिसार होत असल्यास योग्य ती अँटीबायोटिक्स औषधे आपले डॉक्टर देतात.

अतिसार होत असल्यास अशी घ्यावी काळजी :

शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ नये म्हणून वरचेवर पातळ पदार्थ, उकळून गार केलेले पाणी, शहाळ्याचे पाणी, ओआरएस पावडरचे मिश्रण पीत राहावे. ओआरएस पावडर नसल्यास साखर, मीठ व पाण्यापासून घरीच जलसंजीवनीचे मिश्रण करून रुग्णास द्यावे. 

घरीच जलसंजीवनी करण्यासाठी स्वच्छ 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ चांगले एकजीव करावे. ही जलसंजीवनी रुग्णास वरचेवर थोडी थोडी देत राहावी. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते व रुग्ण बरा होतो. एकदा केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. दुसऱ्या दिवशी याचे पुन्हा नवीन मिश्रण करावे व ते वापरावे.

अतिसार झाल्यावर असा घ्यावा आहार :

जुलाब अतिसार होत असल्यास काय खावे..?
रुग्णाला आहार देताना साधे जेवण द्यावे. केळी, तांदूळ, सफरचंद, टोस्ट यांचा आवर्जून समावेश करा. यामुळे मल घट्ट होण्यास मदत होईल. तसेच पुरेसे द्रव पदार्थ म्हणजे पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स मिश्रण, फळांचा रस इत्यादी पातळ पदार्थ वरचेवर प्यावेत.

अतिसार झाल्यास काय खाऊ नये..?
पचनास जड असणारे पदार्थ मसालेदार पदार्थ, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. बाहेरील उघड्यावरील दूषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

आजार तीव्र स्वरूपाचा असेल, भरपूर प्रमाणात पातळ संडासला होत असल्यास, उलटया होत असल्यास किंवा शौचातुन रक्त पडत असल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे असते.

Post a Comment

0 Comments