My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

जाड होण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी काय खावे

जाड होण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी काय खावे

वजन वाढवण्यासाठी काय खावे : मित्रांनो वजन कमी करण्यासाठी अनेक लोक झटपटत असतात. परंतु दुसरी कडे असेही लोक असतात जे जेवण तर दाबून करतात. परंतु काही केल्या त्यांचे वजन वाढत नाही. अशावेळी त्यांच्या समोर मोठा प्रश्न असतो की वजन वाढवण्यासाठी काय खावे आणि तब्येत सुधारण्यासाठी काय करावे. वजन कमी असलेले लोक अनेक रोगांनी ग्रस्त होऊ शकतात. म्हणून या लेखात जाड होण्यासाठी आणि वजन वाढवून तब्येत सुधारण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर चला सुरू करुया….



वजन वाढवण्यासाठी काय खावे

आपल्या पैकी अनेक लोक भरपूर आहार ग्रहण करीत असाल. परंतु तरीही आपले शरीर बारीक आणि सडपातळ असेल तर या मागील प्रमुख कारण आहे आपल्या आहारात असलेली प्रथिने आणि फॅट वाढवणारे प्रोटीन ची कमतरता. पुढे काही खाद्य देण्यात आले आहेत ज्यांना आहारात सामील करून आपण आपले वजन वाढवू शकतात.

1) केळे आणि दूध
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. केळ शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामध्ये अनेक मिनरल्स, विटामिन्स आणि न्यूट्रिएंट्स असतात. एका मध्यम आकाराच्या केळ्यात 120 कॅलरी असतात. जर तुम्ही दिवसभरात वेगवेगळ्या वेळी 6-8 केळे आहारात सामील केले तर आपल्याला याचा खूप लाभ होईल.

दररोज सकाळी उठल्यावर 3 केळे खावेत आणि यावर एक ग्लास दूध प्यावे. हा उपाय नियमित केल्याने एका महिन्यातच तब्येत सुधारण्यात मदत होईल.

2) सोयाबीन वडी
बीन्स कॅलरी ने भरपूर असतात. सोयाबीन ची वडी वजन वाढवण्यास मदत करते यासोबतच यात प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फायबर असतात. सोयाबीन ला आपण दिवसभरात केव्हाही खाऊ शकतात. सकाळी नाश्ता म्हणून तसेच जेवणासोबतही सलाद म्हणून आपण याला खाऊ शकतात.

3) डाळ आणि हरबरे
जर तुम्हाला निरोगी वजन हवे असेल तर तुम्ही दररोज दिवसातून एक वेळ हरबरा आणि डाळींना आपल्या आहारात सामील करू शकतात. हरभऱ्याच्या डाळी मध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट असतात.

याशिवाय मूग डाळ, तूर डाळ आणि पालेभाज्या देखील आपण दिवसातून एकदा आहारात सामील करा. जे लोक मांसाहार करीत नाही त्यांना डाळ आणि हरभरे उत्तम पर्याय आहेत.

4) अंडे
जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी ही तुमच्यासाठी फार उपयोगाची आहेत. अंड्यात पर्याप्त प्रमाणात कॅलरी, फॅट आणि प्रोटीन असतात. ज्या लोकांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी अंडे वरदान आहेत. अंड्यातील प्रथिने स्नायूंचा आकार वाढवतात आदिल शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

चांगले परिणाम मिळवण्यासाठी अंड्याला उकळून त्याच्या वरील आवरण काढल्यानंतर जो पांढरा भाग असतो त्याला खावे. जर लवकर परिणाम हवे असत तर अंड्यातील आतील पिवळा भाग खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही नाश्त्यात अंड्याचे ऑमलेट खाऊ शकतात.

5) सुखा मेवा
सुकामेवा वजन वाढवण्यासाठी एक आरोग्यदायी आणि सोपा पर्याय आहे. सुखा मेवा कॅलरी, फायबर आणि पोषक तत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. या मध्ये बदाम, काजू, अक्रोड, मनुके इत्यादींचा समावेश होतो. सुखा मेवा आपण संध्याकाळी रिकाम्या वेळेत खाऊ शकतात.

सुरुवातीला जाड होण्यासाठी काय खावे

  • दररोज रात्री झोपण्याआधी काळे हरबरे पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी ह्या हरभर्यांना गरम पाण्यात उकळावे व सकाळच्या नाश्त्यात दुधासोबत हे हरभरे खावेत.
  • याच्या अर्ध्या तासानंतर सुखमेवा अथवा केळे खावेत. यानंतर दुपारचे जेवण पोटभर करावे. शक्य होईल तर आपल्या जेवणात देसी घी टाकावे.
  • जेवणाच्या 2-3 तासानंतर परत एकदा काळे हरबरे खावेत.
  • रात्रीच्या जेवणात आपण आपल्या सुविधेनुसार पनीर, भाजी, डाळ, अंडी, मासे, चिकन, सूप इत्यादींचा समावेश करू शकतात.
  • हा diet plan 5 ते 10 दिवसांपर्यंत फॉलो करावा. यादरम्यान फास्ट फूड आणि जंक फूड खाऊ नये.

वजन वाढवण्यासाठी आणि तब्येत सुधारण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

  • जर आपले वजन जास्तच कमी असेल तर फार जास्त व्यायाम करू नये. परंतु बेसिक व्यायाम प्रत्येकाने करायला हवेत. कारण व्यायाम केल्यानंतरच भूक लागते आणि भूक लागल्यावर आपण योग्य आहार ग्रहण करून वजन वाढवू शकतो. म्हणून जाड होण्यासाठी व्यायामाचे महत्व भरपूर आहे.
  • दररोज सकाळ संध्याकाळ वेळ मिळाला की बाहेर फिरायला जावे. पुशअप, पुलअप आणि स्क्वॉट सारखे सामान्य व्यायाम करावेत. याशिवाय आपण जिम देखील जॉईन करू शकतात.

तर मित्रांनो ह्या लेखात वजन वाढवण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती आपण मिळवली. ह्या लेखातील खाद्य पदार्थ आहारात सामील केल्यास आपणास तब्येत सुधारण्यासाठी आणि जाड होण्यासाठी नक्की मदत मिळेल. मित्रांनो जाड होण्यासाठी काय खावे ही माहिती आपणास कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा. आणि मराठी मध्ये आरोग्य व विविध दुखण्यावरील घरगुती उपाय मिळवत राहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.

Post a Comment

0 Comments