My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

खोकला साठी घरगुती उपाय | कोरडा खोकला व छातीत कफ

खोकला साठी घरगुती उपाय | कोरडा खोकला व छातीत कफ 


खोकला घरगुती उपाय: वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या समस्यापैकी खोकला हीदेखील एक सामान्य समस्या आहे. अनेकदा सर्दी आणि खोकला दोन्ही समस्या एकाच वेळी निर्माण होतात. परंतु याशिवाय काही लोकांना सततचा खोकला येत असतो. ही समस्या बऱ्याचदा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आजच्या या लेखात जवळपास सर्वच प्रकारच्या खोकल्याचे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये कोरडा खोकला, ओला खोकला, कफ पातळ करण्यासाठी उपाय, छातीतील कफ काढणे, सततचा खोकला आणि खोकला रामबाण उपाय देण्यात आले आहेत. तर चला सुरू करुया…




खोकला होण्याची कारणे

सर्दी-खोकला होणे सामान्य गोष्ट आहे. वातावरणातील बदल, व्हायरल संक्रमण इत्यादी कारणांमुळे खोकल्याची समस्या निर्माण होते. खोकला होण्याची आणखी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत.

  • वायरल संक्रमण
  • सर्दी वर फ्लू
  • प्रदूषण व वातावरणातील धुळीमुळे
  • अधिक प्रमाणात धुम्रपान करणे
  • टीबी अथवा दमा रोग
  • एलर्जी
  • निमोनिया
  • श्वसन संबंधी संक्रमण
  • वातावरणातील बदल
  • फफ्फुसांचे आजार (कॅन्सर)
  • तोंड कोरडे पडणे (पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे)
  • थंड वस्तू जसे आईस्क्रीम, कोल्ड्रिंक अधिक प्रमाणात सेवन करणे.

खोकला घरगुती उपाय

मीठ पाण्याच्या गुळण्या
एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकावे. व या पाण्याने गळगळा करावा. मीठ पाण्याने गुळण्या केल्याने गळा मोकळा होतो. खोकल्याच्या सामान्य समस्येत हा उपाय फार पूर्वीपासून केला जात आहे. नियमितपणे असे केल्याने गळा आणि श्वसन संबंधी संक्रमण दूर होते. म्हणून खोकल्याची समस्या असल्यास आपण हा उपाय करून पाहु शकतात.

हळद
हळद एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे. खोकल्याच्या समस्येत हळदीचा उपयोग विशेष पद्धतीने केला जातो. यासाठी अर्धा कप गरम पाण्यात एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा काळे मिरे टाकून उकळून घ्यावे. हा काढा आपण 2 ते 3 मिनिटे चांगल्या पद्धतीने उकळू शकतात. यानंतर मधाचा एक मोठा चमचा यात टाकावा. हा काढा आपण दैनिक पद्धतीने जोपर्यंत खोकला चांगला होत नाही तोपर्यंत पिऊ शकतात. मध्ये हळद उपयोगी आहे.

अद्रक
अद्रक हे खोकल्यासाठी लोकप्रिय घरगुती उपाय आहे. यासाठी ताज्या अद्रकला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. यानंतर ह्या तुकड्यांना एक कपभर पाण्यात उकळून घ्यावे. अद्रकच्या ह्या काढामध्ये आपण थोडे मध आणि लिंबुचा रस देखील टाकू शकतात. खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून हा काढा दिवसातून एक वेळा प्यावा.

तुळशी चा उपयोग
खोकला घरगुती उपाय मध्ये तुळस च्या पानांचा रस काढून त्यात थोडे मध व अद्रक चा रस मिक्स करावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा सेवन केले जाऊ शकते. असे केल्याने खोकल्याच्या समस्येत लवकरात लवकर आराम मिळतो.

काळी मिरी
काळे मिरे खोकला च्या समस्येत आराम देण्यासाठी उपयोगी आहेत. यासाठी सर्वात आधी यांना बारीक कुटून घ्यावे. व यानंतर या पावडर ला तुपामध्ये भाजून घ्यावे. भाजलेले हे पाउडर दररोज खावे.

कोरडा खोकला साठी घरगुती उपाय

गुड
गुड मध्ये अँटी ऍलर्जिक गुणधर्म असतात जे छातीत असलेले कफ बाहेर काढण्यासाठी उपयोगी सिद्ध होतात. ओला खोकला आणि श्वास घेण्यात परेशानी असल्यास कांदा आणि गुड दिवसातून दोन ते तीन वेळा सोबत सेवन करावेत. असे केल्याने ओला खोकल्यात आराम मिळतो.

सुंठ
खोकल्याच्या समस्येत सुंठ पावडर अत्यंत फायदेमंद आहे. याचा उपयोग पुढील प्रमाणे करावा. सर्वात आधी एका वाटीत अर्धा चमचा सुंठ पावडर घ्यावे या पावडर मध्ये एक चमचा मध टाकावे. हे मिश्रण सकाळच्या नाश्त्याच्या एक ते दोन तासानंतर सेवन करावे. परंतु लक्षात असू द्या की याच्या सेवनानंतर अर्धा तास तरी पाणी प्यायला नको.

वाफ घेणे
जर तुम्ही कोरड्या तसेच ओल्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असाल तर वाफ घेणे हा उपाय तुमच्या साठी उपयोगी ठरू शकतो. वाफ घेतल्याने नाक, गळा तसेच छातीतील कफ मोकळे होतात आणि खोकल्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते. लवकर परिणाम मिळवण्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी 5 मिनिटे वाफ नक्की घ्यावी.

जास्तीत जास्त पाणी प्यावे
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे गळा कोरडा होऊ लागतो. ज्यामुळे खोकल्याचे समस्या निर्माण होते. म्हणून खोकला होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करायला हवे. दिवसातून कमीत कमी 5-6 लिटर पाणी प्यायला हवे. त्याशिवाय ताज्या फळांचा रस आणि लिंबू पाणी देखील आपण पिऊ शकतात.

जलनेती

खोकला घरगुती उपाय साठी जलनीती (जलनेती) ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. या उपायाने संपूर्ण नाकाचे शुद्धीकरण केले जाते. जलनेती करण्यासाठी एका नाकपुडी द्वारे मिठाचे किंवा साधे पाणी आत टाकले जाते. व दुसऱ्या नाकपुडी द्वारे हे पाणी बाहेर काढले जाते. बंद असलेले नाक उघडण्यासाठी देखील हा उपाय प्रभावी आहे सर्दी खोकला व इतर कारणांमुळे होणाऱ्या खोकल्याची लक्षणे कमी करण्यासाठी जलनेती प्रभावी आयुर्वेदिक उपचार आहे. 

खोकल्याचा समस्येत डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा

तसे पाहता सर्दी आणि खोकल्याची समस्या अतिशय सामान्य आणि आपोआप ठीक होणारी आहे. परंतु जर आपल्याला पुढील लक्षणे दिसत असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

  • श्वास घेण्यात परेशानी होणे
  • गळा व चेहऱ्यावर सुजन निर्माण होणे
  • अन्न गिळण्यात परेशानी होणे
  • खोकला आल्यानंतर तोंडातून रक्त येणे
  • खोकल्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे
  • खोकल्यामुळे जर ताप येत असेल तर
  • जर खोकल्याचे समस्या 8-10 दिवसांनंतरही ठीक होत नसेल तर डॉक्टरांकडे जावे

तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण खोकला घरगुती उपाय, कोरडा खोकला साठी घरगुती उपाय व सततचा खोकला कसा दूर करावा या विषयीची काही माहिती मिळवली. आशा आहे की ही माहिती व हे घरगुती उपाय आपण नक्की करून पहाल आणि आपली ह्या समस्येपासून लवकरात लवकर मुक्ती होईल. परंतु लक्षात असू द्या जर खोकल्यासोबत वर दिलेले लक्षण दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण सतत खोकला येणे हे टीबी व कोरोना सारख्या प्राणघातक रोगांचे देखील लक्षण असू शकते. धन्यवाद,…



Post a Comment

0 Comments