My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढतात ‘हे’ १० पदार्थ, ताबडतोब करा डाएटमध्ये समाविष्ट!

 

रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढतात ‘हे’ १० पदार्थ, ताबडतोब करा डाएटमध्ये समाविष्ट!




सध्या ऑक्सिजनची शरीरातील पातळी संतुलित कशी राखावी यावर सगळीकडे चर्चा होत आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही या लेखातून तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची वाढण्यास तुम्हाला मदत होईल. आहार ही अशी गोष्ट हे जी कोणत्याही शारीरिक समस्येला रोखू शकते. पण त्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते आणि कोणता आहार घ्यावा हे देखील माहित असायला हवे.

आंबा, पपई, गाजर व खजूर

आंबा व पपई या खाद्यपदार्थांची पीएच लेव्हल 8.5 असते. ही दोन्ही फळे मूत्रपिंड स्वच्छ करण्यात प्रभावी ठरतात. पपई आतडे साफ ठेवते आणि मलविसर्जनास नियंत्रित करते. विशेषत: ही फळे कच्ची खाल्ल्यास ते आतड्यांमधील हानिकारक पदार्थ नष्ट करण्याचे काम करतात. तसंच रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी गाजर, खजूर, मनुका, जांभूळ, पिकलेली केळी, लसूण आणि ओवा खाणं आवश्यक असतं. खरं तर या सर्व पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात म्हणून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचे पीएच मूल्य 8 असते. खजूर, लसूण आणि जांभळामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे आपण रक्तदाब नियंत्रित करू शकतो.

पेर आणि अननस खूप खा

पेर आणि अननस जर तुम्ही पुरेश्या प्रमाणात खात असाल तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो. या पदार्थांच्या सेवनाने ऑक्सिजनची पातळी खूप वाढते. या सर्व पदार्थांची पीएच वेल्यू 8.5 आहे. या सोबतच हे व्हिटॅमिन ए, बी आणि सी सह अँटीऑक्सिडेंटने परिपूर्ण आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्त प्रवाह सुरळीत होऊन उच्च रक्तदाबाची समस्या कमी केली जाऊ शकते. अनेकांना ही दोन फळे जास्त आवडत नाही पण त्यांचे फायदे पाहता या दोन फळांचे सेवन नक्की करायला हवे.

लिंबू देखील आहे लाभदायक

लिंबू हे सुद्धा ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. हे एक आम्लीय फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीरात जाऊन ते अल्काईन मध्ये रुपांतरीत होते. खोकला, सर्दी, ताप, हार्ट बर्न आणी विषाणू संक्रमणा संबंधित आजारांमध्ये लिंबाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. लिव्हर साठी हे एक चांगले टॉनिक समजले जाते. आपल्या घरात नेहमी असणारा एक साधा लिंबू देखील एवढ्या फायद्याचा असतो हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे याचे फायदे ओळखा आणि लिंबाचा योग्य वापर करा.


कलिंगड सुद्धा आहे उपयोगी

कलिंगड तर सर्वांनाच आवडते, परंतु अनेकांना हे माहित नसते की कलिंगड खाल्ल्याने रक्तामधील ऑक्सिजनची कमतरता पूर्ण होते. हे फळ 9 पीएच लेवल सह सर्वात जास्त अल्काईन आहे. यात असलेले फायबर आणि पाणी यामुळे हे हलके मुत्रवर्धक म्हणून सुद्धा काम करते. एवढेच नाही तर यात लाइकोपीन, बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन-सी चा देखील खूप मोठा स्त्रोत असतो. कोलनच्या सफाईसाठी प्रत्येक व्यक्तीने टरबुजाचे सेवन करायलाच हवे. जर तुम्ही या काळात कलिंगड खात नसाल तर तुम्ही अवश्य आहारात त्याचा समावेश केला पाहिजे.

किवी आणि फ्रुट ज्यूस

किवी आणि फ्रुट ज्यूसचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते कारण लोकांना माहित आहे की उत्तम आरोग्यासाठी या दोन पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु रक्त प्रवाहामध्ये ऑक्सिजनचा स्तर वाढवण्यासाठी देखील हे दोन पदार्थ महत्त्वपूर्ण असतात हे फार कमी लोकांना ठावूक आहे. पबमेड PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार किवी आणि फ्रुट ज्यूस मध्ये फ्लेवेनॉइड मोठ्या प्रमाणात असते. यात नैसर्गिक साखर असते जी आहार पचल्यावर आम्लीय यौगिक बनत नाही. या फळांमध्ये असे गुण आहेत जे अल्काईन निर्माणाला चालना देऊन शरीरातील उर्जा वाढवतात.


अल्काईनयुक्त आहार व शिमला मिरची

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी अल्काईन युक्त आहाराचा समावेश रोजच्या आहारात करायला हवा. यामुळे रक्तप्रवाहातील ऑक्सिजनची पातळी वाढते. लेक्टीक अॅसिडचे निर्माण रोखले जाते. तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या कार्यांना चालना मिळते. शरीरातील पीएच लेव्हल सामान्य राहण्यास मदत होते. तुमच्या अवयवांना योग्य प्रकारे काम करण्याची क्षमता मिळते. म्हणूनच या कठीण काळात तुम्ही जास्तीत जास्त अल्काईन युक्त पदार्थ खायला हवेत, जेणेकरून शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य राहण्या सोबतच शरीर निरोगी सुद्धा राहील. तसंच शिमला मिरचीचे पीएच मूल्य 8.5 असते. व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असणारी शिमला मिरची रोगांशी आणि तणाव निर्माण करणार्‍या फ्री रॅडिकल्सशी मदत करते. इतकेच नाही तर यामध्ये अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने एंडोक्राइन सिस्टमसाठी ही खूप चांगली आहे. तर मंडळी जर या कठीण काळात तुम्हाला देखील तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर संतुलित राखायचा असेल तर अवश्य या पदार्थांचे सेवन सुरु करा.



Post a Comment

0 Comments