My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

 

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

प्रत्येकीला सुंदर चेहरा आणि चमकदार चेहरा नक्कीच हवा असतो. त्यासाठी काही ना काही उत्पादनं वापरून आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. पण तरीही काही जणांच्या चेहऱ्यावर काही काळे डाग येत असतात. चेहऱ्यावर अचानक झालेल्या जखमा अथवा डाग हे आपल्याला नक्कीच नकोसे वाटतात. मग अशावेळी आपल्याला हे काळे डाग काढण्यासाठी पार्लरच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण आता तसं करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढायचे असतील तर तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता. घरच्या घरी तुम्हाला जर हे चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील तर तुम्ही काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हे काम नक्कीच करू शकता. नियमित हा प्रयोग केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं काढून टाकण्यास मदत करतात. जाणून घेऊया नक्की आपल्याला काय उपाय करता येऊ शकतील. 


Table of Contents

  1. चेहऱ्यावर काळे डाग नक्की का येतात? (What Causes Black Spots On Face In Marathi)
  2. कशी घ्याल काळे डाग पडू नयेत यासाठी काळजी (How To Prevent Dark Spots In Marathi)
  3. चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय (Home Remedies For Dark Spots On Face In Marathi)
  4. चेहऱ्यावरील काळ्या डागांवर उपचार (Treatments For Dark Spots In Marathi)
  5. प्रश्नोत्तरं (FAQs)

चेहऱ्यावर काळे डाग नक्की का येतात? (What Causes Black Spots On Face In Marathi)

चेहऱ्यावर नक्की काळे डाग का निर्माण होतात असाही प्रश्न निर्माण होतो. पण त्याची कारणं बहुतांशी लोकांना माहीत नसतात. जाणून घेऊया नक्की काय आहेत कारणं – 

अनुवंशिक – काही जणांना चेहऱ्यावर आलेले काळे डाग हे अनुवंशिक असतात. त्यावर बऱ्याचदा काहीही उपचार केले तरीही ते डाग तसेच राहतात. 

सूर्यकिरण – सूर्यकिरण हे चेहऱ्यावर डाग येण्याचं मुख्य कारण आहे. त्वचेतील मेलॅनीनचं प्रमाण सूर्यकिरणांमुळे वाढतं. जेव्हा आपली त्वचा सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात येते तेव्हा हे मेलॅनीन कमी अधिक प्रमाणात वाढतं आणि काळे डाग वाढतात. 

हार्मोन्स बदल – हार्मोनल बदलांमुळेही तुमच्या चेहऱ्यावर डाग वाढतात. हार्मोन्स बदल होत असताना जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कामध्ये येते तेव्हा मेलॅनीनचं प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरावर डाग निर्माण होतात. 

वाढतं वय – वाढत्या वयात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच चेहऱ्यावर डाग येण्यासारखीदेखील समस्या उद्भवते. वयाच्या चाळीशीनंतर साधारण त्वचेची पुनर्निर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे काळे डाग अधिक वाढते. 

परफ्युम – परफ्युममध्ये फोटोसेन्सिटायझर असतं जे सूर्यकिरणांना त्वचेकडे आकर्षित करतं आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. परफ्युम लावल्यानंतर तुम्ही उन्हात आल्यास काळे डाग पडतात. 

प्रदूषण – प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये धूळ जमा होते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर डाग निर्माण होण्यात होतो. 

कशी घ्याल काळे डाग पडू नयेत यासाठी काळजी (How To Prevent Dark Spots In Marathi)

चेहऱ्यावर काळे डाग पडू नयेत यासाठी आपल्याला काय काळजी घेता येईल ते आपण पाहूया. याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यानंतरही काळे डाग आले तर त्यावर घरगुती  उपचार हे आहेतच. वाचूया कशी घ्यायची काळजी 

1. नेहमी करा SPF चा वापर (Use SPF)

काळे डाग येण्याचं कारण म्हणजे सूर्यकिरण. त्यामुळे तुम्ही कधीही घराच्या बाहेर जाणार असाल तेव्हा नियमित SPF चा वापर करा. त्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला या सूर्यकिरणांच्या त्रासाने चेहऱ्यावर नक्कीच काळे डाग येऊ शकतात. 

2. हॅट आणि गॉगल्स (Hats & Sunglasses)

उन्हात जाताना नियमित तुम्ही टोपी अर्थात हॅट अथवा गॉगल्सचा वापर करा. सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या त्वचेवर येण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा मिळतो. हॅट आणि गॉगल्स वापरून तुम्ही चेहरा आणि तुमची त्वचा सूर्यकिरणांपासून वाचवणं हा अतिशय सोपा उपाय आहे.

3. अँटिऑक्सिडंट्सचा करा जेवणात वापर (Add Antioxidants To Your Diet)

तुम्ही जितके जास्त अँटिऑक्सिडंट्स आपण जेवणामध्ये समाविष्ट करू ते अधिक चांगलं ठरतं. अँटिऑक्सिडंट्स हे तुमच्या शरीरावर एसपीएफप्रमाणेच काम करतात. यासाठी तुम्ही अधिकाधिक फळांचा तुमच्या आहारात समावेश करून घ्यायला हवा. डाळिंब, संत्र, द्राक्ष यासारखी फळं तुम्ही तुमच्या आहारातही समाविष्ट करून घ्या. 

4. एक्सफोलिएट करा आणि वापरा सिरम (Exfoliate & Use Serum)

चेहऱ्यावर येणारे ब्राऊन स्पॉट्स थांबवण्यासाठी तुम्ही ही काळजी घेऊ शकता. तुम्ही नियमित तुमचा चेहरा एक्सफोलिएट करायला हवा शिवाय तुम्ही सिरमचा वापर करत राहिलात तर तुम्ही केलेल्या मेकअपचा वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होऊन काळे डाग येणार नाहीत. त्यामुळे याचा वापर करा. 

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय (Home Remedies For Dark Spots On Face In Marathi)

चेहऱ्यावरील डाग हे कोणालाच नाही आवडत. त्यासाठी आपण विविध उपाय शोधत असतो. बऱ्याचदा पार्लरचाही आधार घेतो. पण तुम्हाला घरगुती उपायदेखील करता येतात. पाहूया काय आहेत घरगुती उपाय – 

1. मध (Honey)

मध हा तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी घरातील एक उत्तम रामबाण उपाय आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो हेदेखील तुम्ही लक्षात घ्या. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे तुमची त्वचा अधिक उजळण्यासाठी याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावर जर काही जखमांच्या खुणा असतील तर मध अतिशय फायदेशीर ठरतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग असणाऱ्या अथवा जखमा असणाऱ्या ठिकाणी मधाचे काही थेंब लावा. तसंच तुम्ही मधामध्ये लिंबाचा रसही मिसळू शकता आणि त्याचे थेंब तुम्ही याठिकाणी लावू शकता. त्याशिवाय तुम्ही मुलतानी मातीसह मधाचा वापर केल्यास, डाग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डाग घालवण्यासाठी तुम्ही या उपायाचा नियमित घरच्या घरी वापर करू शकता. 

ढवण्याची ग्रोथ यामुळे थांबवण्यात येते. 

3. केमिकल पील्स (Chemical Peels)

तुमच्या चेहऱ्यावरील अथवा त्वचेवरील डागांना काही केमिकल पील्स अप्लाय करण्यात येतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर तकाकी येऊन चेहरा एक्स्फो

2. आंबट पदार्थ – लिंबू (Lemon)

आंबट पदार्थ म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला उद्भवेल. पण आपल्या घरात अनेक आंबट पदार्थ असतात. लिंबू, व्हिनेगर, टॉमेटो हे आपल्या घरात कायम असणारे पदार्थ आहेत. त्याचा उपयोग आपण चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी नक्कीच करू शकतो. यातील विटामिन सी मुळे तुमची त्वचा अधिक उजळवण्यासाठी उपयोग होतो. फक्त हे पदार्थ जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावाल तेव्हा तुम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर जिथे  डाग आहेत तिथेच तुम्ही लिंबू, टॉमेटो आणि व्हिनेगर लावा. इतर ठिकाणी याचा उपयोग करू नका. तसंच हे लावल्यावर सुकेपर्यंत वाट पाहा आणि मग पाण्याने धुवून टाका. 

3. काकडी (Cucumber)

काकडी ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. तुम्ही नियमित काकडीचा वापर केल्यास, तुम्हाला तुमच्या डोळ्यांखाcfhddली झालेली काळी वर्तुळं काढून टाकण्यास नक्कीच फायदा होतो. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तुम्ही काकडीचे काप आपल्या डोळ्यांवर लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स तुम्ही ते काप तसेच ठेवा आणि झोपा. तुम्हाला असं केल्याने चेहऱ्यावरील डाग घालवायला विशेषतः काकडीच्या थंडाव्याने डोळ्यांखालील जमलेली काळी वर्तुळं घालवण्यासाठी मदत मिळते. त्याशिवाय तुमचा चेहरा आणि डोळेही फ्रेश दिसतात. 

4. चंदन (Sandalwood)

चंदन आपण आपल्या चेहऱ्यासाठी नेहमीच वापरतो. चंदनाचा फेसपॅक चेहऱ्याला उजळपणा मिळवून देतो. शुद्ध चंदनामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी पोषक तत्व असतात. तसंच तुम्ही चंदन पाण्यात अथवा गुलाबपाण्यात अथवा दुधामध्ये मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावलंत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चंदन पावडरमध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे चेहऱ्यासाठी तो उपयुक्त ठरतो. 

5. बटाटा (Potato)

बटाटा कापून दोन मिनिट्ससाठी एका भांड्यात भिजवून ठेवा. आता पाण्यातून काढून बटाटा तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग असतील तिथे चोळा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. यामुळे तुमच्या त्वचेवर होणारा परिणाम तुम्हाला नक्कीच आवडेल. 

6. कोरफड (Aloe Vera)

कोरफड हे आपल्या त्वचेसाठी उत्कृष्ट औषध समजण्यात येतं. तुम्ही याचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठीही करू शकता. नैसर्गिक कोरफड जेल अथवा रस तुम्ही काढा आणि तसाच तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा. हे दिवसातून तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ करा. अर्धा तास झाल्यावर कोमट पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवा. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर मॉईस्चराईजर अथवा सिरम लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते. 


6. अॅप्पल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अॅप्पल साईड व्हिनेगरमध्ये असणारा आंबटपणा हा तुमच्या चेहऱ्यावरील डागांना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. एका भांड्यात पाणी आणि अॅप्पल साईड व्हिनेगर समप्रमाणात घ्या. व्यवस्थित मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबाचा रसही मिक्स करू शकता. हे मिक्स्चर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिट्स ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर मॉईस्चराईजर लावा. 

7. ताक (Buttermilk)

ताकदेखील तुमच्या चेहऱ्यासाठी उपयुक्त घरगुती उपाय ठरतो. तुम्ही ताक तुमच्या चेहऱ्यावरील डागांवर डायरेक्ट लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि मग तुमच्या आवडतं सिरम अथवा मॉईस्चराईजर चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही मिक्स करून वापरू शकता. 

8. कॅस्टर ऑईल (Castor Oil)

कॅस्टर ऑईल हा पर्यायदेखील तुम्हाला घरगुती उपायांमध्ये करता येईल. यामध्ये तुम्हाला जास्त काहीच करायची गरज भासत नाही. तुम्हाला फक्त काही कॅस्टर ऑईलचे थेंब हातावर घ्यायचे आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरील डाग असणाऱ्या ठिकाणी लावायचे आहेत. तसंच हा उपाय तुमच्या चेहऱ्यावरील डाग जाईपर्यंत तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ करू शकता. 

9. पपई (Papaya)

पपईमध्ये त्वचेसाठी पोषक तत्व समाविष्ट असतात. त्वचा चांगली राहावी यासाठी नेहमी पपई खायलादेखील सांगतात आणि त्वचेसाठीदेखील याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्ही चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी पपईची सालं आणि बिया काढून व्यवस्थित मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि साधारण 20-30 मिनिट्स तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ दिवसातून दोनदा केल्यास, तुम्हाला लवकरच त्याचा परिणाम दिसून येईल. 

10. हळद (Turmeric)

हळद हा अगदी पूर्वपरंपरागत चालत आलेला घरगुती उपाय आहे. आपल्या चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही 2 चमचे तांदळाच्या पेजेचं पाणी, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा हळद घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांना लावा. साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि त्यावर मॉईस्चराईजर लावा. 


11. हायड्रोजन पॅराक्साईड (Hydrogen Peroxide)

कदाचित हायड्रोजन पॅराक्साईड वाचून तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल. पण यामुळेदेखील तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डाग घालवण्यास फायदा होतो. एका ग्लासामध्ये 1 चमचा दूध आणि 1 चमचा हायड्रोजन पॅराक्साईड घ्या. त्यानंतर त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून तुम्ही चेहऱ्यावरील काळ्या डागांना लावा. साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ पुसल्यावर तुमचं आवडतं सिरम अथवा मॉईस्चराईजर लावा. 

12. पार्सले (Parsley)

पार्सले खरं तर महाग मिळतं. पण तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा मिळतो. एका कप कापलेले पार्सले, त्यामध्ये ½ चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा दही घालून नीट मिक्स करा. हे तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर लावा. 15 मिनिट्स ठेवून तुम्ही हे धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता.


चेहऱ्यावरील काळ्या डागांवर उपचार (Treatments For Dark Spots In Marathi)

काळ्या डागांवर जसे घरगुती उपचार आहेत तशाच तुम्ही काही ट्रीटमेंट्सदेखील करून घेऊ शकता. त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया

1. लेझर ट्रीटमेंट (Laser Treatment)

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी विविध प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. सर्वात कॉमन लेझर ट्रीटमेंट आहे ती म्हणजे पल्स लाईट लेझर. सहसा याचा वापर करण्यात येतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग स्पॉट करून ही ट्रीटमेंट करण्यात येते.

2. मायक्रोडर्माब्रेशन (Microdermabration)

या ट्रीटमेंटदरम्यान डर्मेटोलॉजिस्ट एक डिव्हाईसचा वापर करतात ज्यामध्ये त्वचेचा बाहेरचा लेअर काढून टाकण्यात येतो. तसंच काळे डाग वालिएट करण्यास होतो उपयोग. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी याचा उपयोग होतो. 

4. क्रेयोथेरपी (Cryotherapy)

क्रेयोथेरपी या ट्रीटमेंटमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लिक्विड नायट्रोजन लावण्यात येतं. जे तुमच्या त्वचेवरील काळे डाग घालवण्यास उपयुक्त ठरतं. त्यानंतर तुमची त्वचा अधिक उजळण्यासही मदत मिळते.

Post a Comment

0 Comments