My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

'या' 4 चुका ठरतात पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत!

 

'या' 4 चुका ठरतात पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत!

प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. तसेच सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी अनेकजण सतत काहीना काही उपाय करत असतात. अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो.

प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. तसेच सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी अनेकजण सतत काहीना काही उपाय करत असतात. अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो. पिंपल्स येणाची अनेक कारणं असतात. प्रदुषण, शरीरात होणारे बदल, धूळ, घाण, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन ही कारणंही चेहऱ्यावर पिंपल्स येणासाठी जबाबदार ठरतात. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणं आणि केसांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेही पिंपल्स येऊ शकतात. कधी कधी जेव्हा आपण आपल्या त्वचेला क्लिंजिंग करतो. त्यावेळी आपल्या त्वचेवरील रोमछिद्र मोठी होऊन त्यामध्ये घाण जमा होते. यामुळेही चेहऱ्यावर घाण जमा होते. यापासून सुटका करण्यासाठी योग्य उपाय शोधण्याआधी पिंपल्स येण्याचं खरं कारण जाणून घेणं गरजेच आहे. 

या कारणांमुळे होते पिंपल्सची समस्या :

1. सतत केस चेहऱ्यावर येणं

केस सतत चेहऱ्यावर आल्यामुळेदेखील पिंपल्सची समस्या होऊ शकते. जर तुमचे केस सतत त्वचेच्या संपर्कात येत असतील तर हे त्वचेवर बॅक्टेरिअल इंटरफेरेंस होण्याचं कारण ठरतं. त्यामुळे केस सतत त्वचेच्या संपर्कात येऊ देऊ नका. 

2. आंघोळ न करणं

वर्कआउट केल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं असतं. वर्कआउट करताना आपल्याला फार घाम येतो आणि या घामाद्वारे शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर आंघोळ केली नाही तर हे घटक शरीरावर तसे रहतात आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर आंघोळ करणं आणि केस धुणं गरजेचं असतं. 

3. केसांमध्ये होणारा कोंडा

चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवण्यासाठी केसांतील कोंडाही कारणीभूत ठरतो. केसात होणारा कोंडा म्हणजे स्काल्पला होणारं बॅक्टेरिअल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होय. जे केसांमार्फत आपल्या त्वचेवरही पसरतं. त्यासाठी अॅन्टीडॅन्ड्रफ शॅम्पूचा वापर करा आणि केस मोकळे सोडू नका. 

4. हेअर स्टाइल्स

केसांच्या हेअर स्टाइल करण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे स्काल्प कोरडे होतात. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी स्काल्पमध्ये अधिक तेल तयार होतं. तसेच त्वचाही तेलकट होते. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. याव्यतिरिक्त आपण अनेकदा हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतो. जे त्वचेसाठी नुकसानदायी ठरतात. यामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. 


पिंपल्स का येतात?

  • रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा नियमित वापर केला की, त्वचेला याचा संसर्ग होऊन मुरुमं येतात.
  • अतिगोड पदार्थांचा जास्त समावेश असणे हेही मुरुमे येण्याचे एक कारण होऊ शकते.
  • पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फूडचा आहारात जास्त समावेश केला की, चेहऱ्याची त्वचा तेलकट होते. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे मुरुमे येऊ शकतात.
  • बऱ्याच बॉडी लोशनमध्ये लोण्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. असे बॉडी लोशन जास्त वापरले की, मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते.
  • मोबाईल कानाला लावून जास्त वेळ बोलल्याने त्यातील जिवाणु त्वचेवरील छिद्रे बंद करतात. यामुळेही मुरुमे येतात.
  • जिमला गेल्यावर किंवा धावल्यामुळे अनेक प्रकारचे जिवाणु आपल्या शरीरावर जमा होतात. अशावेळी आंघोळ न केल्याने मुरुमे-पुरळ येतात.
  • दिवसभरात कमीत कमी २ वेळा चेहरा धुवावा. नाहीतर चेहऱ्याला आलेल्या घामामुळे छिद्रे बंद होतात. यामुळे चेहऱ्यावर मुरमे येऊ शकतात.
  • धूम्रपान केल्याने त्वचेला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मुरुमं, सुरकुत्या येऊ शकतात.
  • चेहऱ्यावर मुरुमं येण्याचं कारण म्हणजे आहारात मसालेदार-तळलेल्या पदार्थांचा जास्त समावेश असणं. यामुळे त्वचेची जळजळही होते.
  • केस वेळच्या वेळी न धुतल्याने केसात कोंडा होतो. यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होऊ लागतात आणि चेहरा तसेच पाठीवरही मुरमं येतात.

चेहऱ्यावर मुरूम का येतात?

चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल हे त्यातील मुख्य कारण, याशिवाय चेहऱ्याची कांती जास्त तेलकट असणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे अशी इतर करणेही असू शकतात. आंतररसाच्या प्रभावाखाली त्वचेचा तेलकटपणा वाढतो. त्या वाढत्या तेलावर त्वचेतील जंतूंची प्रक्रिया होऊन तेल वाहून नेणाऱ्या नळ्या चोंदतात व तेल, पेशी अडवून पुटकुळ्या तयार होतात. त्यात तयार करणाऱ्या जंतूंची वाढ झाली तर पू तयार होतो.

वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर कोणती काळजी घ्यावी?

वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर   मुला-मुलींना त्याची लाज वाटते. किंबहुना त्यामुळे बरेचदा न्यूनगंड निर्माण होतो. मग हे मुरूम घालविण्याकरिता चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. अशा वेळेस कोणत्याही जाहिरातींना बळी न पडता फक्त वारंवार चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून चेहरा स्वच्छ धुणे, तसेच, चेहऱ्याला कडूनिंबाच्या पाल्याचा रस लावणे, केसात कोंडा होऊ न देणे (केसांना दही किंवा लिंबू लावून केस धुतल्याने कोंडा कमी होतो.) जमल्यास डाळीच्या पीठाने चेहरा धुणे इत्यादी घरगुती उपाय करावेत. तसेच बद्धकोष्टता होऊ नये म्हणून भरपूर पालेभाज्या, सालासकट फळे, कडधान्ये खावीत. रोज भरपूर व्यायाम करावा. हे सर्व केल्याने आपली त्वचा निरोगी व तेजस्वी होते. चेहऱ्यावरील मुरुमे फोडू नयेत, नाहीतर त्यात जंतूलागण होते. मुरुमे जास्त असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून मलमे, साबण वापरू नये. त्याने अपाय होऊ शकतो.



Post a Comment

0 Comments