My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

टायफॉईड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Typhoid fever in Marathi

 

टायफॉईड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Typhoid fever in Marathi


विषमज्वर – Typhoid fever in Marathi :

टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या जीवाणुपासून होतो. साल्मोनेला टायफी हा जीवाणु (बॅक्टेरिया) टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. टायफॉईड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफॉईड रुग्ण तसेच टायफॉईड आजारातून नुकतेच बरे झालेली व्यक्ती यांच्या मलमूत्रद्वारा हे जीवाणू पसरत असतात.

टायफॉइड होण्याची कारणे – Typhoid causes in Marathi :

पावसाळ्यातील दूषित पाण्याच्या संपर्कामधून याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. मलमूत्रद्वारा दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हाताद्वारे हे जिवाणू स्वस्थ व्यक्तीच्या तोंडातून शरीरात प्रवेश करतात आणि आतड्यात जाऊन त्या जिवाणूंची संख्या वाढते त्यानंतर ते आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे मळमळते, उलट्या होतात, पोटात दुखते, पोटात मुरडा मारतो, पाण्यासारखे पातळ हिरवट रंगाचे शौचास होते, कधीकधी रक्तमिश्रित असे जुलाब चालू होतात.

टायफॉईडची लक्षणे – Symptoms of Typhoid in Marathi :

जिवाणू संक्रमण झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यानंतर लक्षणे दिसू लागतात.
टाइफाइड रुग्णामध्ये आढळणारी सामान्य लक्षणे –

  • ताप येतो, सुरवातीला हलका ताप असतो नंतर तो 103-104 डिग्री पर्यंत गेलेला असतो.
  • ‎पोटात वेदना असतात.
  • ‎डोकेदुखी, अंगदुखी.
  • ‎थकवा येतो, अशक्त वाटते.
  • ‎भूक कमी होते.
  • ‎काही रुग्णांना छाती व पोटावर चपटे गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ उठतात. अशी लक्षणे टायफॉईडमध्ये दिसतात.

विषमज्वर किंवा टायफॉईड तापाचे निदान असे करतात :

टायफॉईडचे निदान करण्यासाठी रुग्णाचे रक्त व मल परीक्षण करण्यात येते व त्यामध्ये टायफॉईड जिवाणू आहेत का ते पाहिले जाते. तसेच एंजाइम लिंक्ड इम्यूनोसोर्बेंट टेस्ट, फ्लुरोसेंट एंटीबाडी टेस्ट, विडाल टेस्ट सुध्दा केली जाऊ शकतात.

टायफॉइड प्रतिबंधात्मक उपाय – टायफॉईड होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

Typhoid fever prevention tips in Marathi.

  • वैयक्तिक स्वच्छता पाळावी.
  • ‎शौचविधीनंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • ‎उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  • ‎घरामध्ये अन्न झाकुन ठेवावे.
  • ‎पाणी उकळून थंड करून प्यावे.
  • ‎पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे खाऊ नका.
  • ‎टायफॉइडची लस घ्यावी. टायफॉइडच्या लसींचा प्रभाव काही वर्षांनंतर कमी होतो, याआधी आपल्याला लस टोचली असेल तर, आता बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे का यासंबंधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. प्रत्येक 3 वर्ष मध्ये याचा बूस्टर डोस घेणे गरजेचे असते..

टायफॉईडवरील उपचार – Typhoid fever treatment in Marathi :

योग्य एंटीबायोटिक उपचार केल्यास 1 ते 2 दिवसात रुग्णाच्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते आणि रुग्णास ठीक होण्यासाठी 10 ते 14 दिवस लागू शकतात. टाइफाइडला योग्य वेळी निदान करून योग्य उपचार करणे आवश्यक असते.

कारण उपचाराआभावी टायफॉईडचे जिवाणू आतड्यात लहान-लहान छिद्रे (अल्सर) बनवितात. त्यातून पुढे गंभीर समस्या निर्माण होते आणि ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे टायफॉईड झाल्यास कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालू नये.

Post a Comment

0 Comments