My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय कराच

 

शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय कराच

शरीरावरील चामखीळ

अनेकांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक तीळ, चामखीळ किंवा मोस असतात. खरं तर लहान दिसणाऱ्या घटकांचा त्रास किंवा अपाय काहीच नसतो. मात्र त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यातच मोस आणि चामखीळ हे शरीराच्या कुठल्याही भागावर असतात.

तसंच त्यांचा आकार तीळापेक्षा किंचित मोठा असल्यामुळे अनेकांना ते आवडत नाही. सहाजिकच त्यामुळे अनेक जण विविध मार्गाने ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु असंख्य प्रयत्न केल्यानंतरही काहींचे मोस किंवा चामखीळ जात नाही. अशावेळी असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे या समस्येवर नक्कीच फायदा होऊ शकतो.

१. केळीची साल

केळी खाल्यानंतर आपण कायमच त्याचं साल फेकून देतो. मात्र या केळीच्या सालांमध्ये अनेक गुणधर्म लपलेले आहेत. या सालींचा वापर आपण चामखीळ घालवण्यासाठी करु शकतो. त्यासाठी केळीचं साल चामखीळ असलेल्या ठिकाणी ठेवावं आणि एका कापडाच्या सहाय्याने त्याला रात्रभर बांधून ठेवून द्यावं. हा प्रयोग काही दिवस रोज रात्री झोपताना केल्यास फरक नक्कीच जाणवतो.

२. लसूण

प्रत्येक पदार्थाची चव वाढविणारा लसूण चामखीळ काढण्यासाठी उपयोगी ठरतो. लसणामध्ये अॅटीबॅक्टेरियल आणि अॅटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे चामखीळ काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लसणाच्या २-३ पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट चामखीळ किंवा मोस असलेल्या जागेवर १ तास लावून ठेवावी. त्यानंतर गार पाण्याने पेस्ट स्वच्छ पुसून घ्यावी. हा उपाय दिवसातून दोन वेळा करा.

३. सफरचंदाचं व्हिनेगर

चामखीळ किंवा मोस दूर करण्यासाठी त्याच्या मुळाशी सफरचंदाचा व्हिनेगर लावणं फायदेशीर आहे. दिवसातून तीन वेळा कापसाच्या सहाय्याने चामखीळ, मोस याच्यावर व्हिनेगर लावावं आणि कापसाने ते झाकावं. हा उपाय काही दिवस नियमित केल्यानंतर हळूहळू मोसचा रंग बदलतो आणि तो आपोआप गळून पडतो.

४. कांद्याचा रस

कांद्याचा रस नियमितपणे मोस असलेल्या जागी लावा. असं केल्यामुळे मोस काही दिवसांनी हळूहळू सुकत जातो आणि तो अलगदपणे निघतो.

५. बेकिंग सोडा

घरातील लहानसहान कामासाठी किंवा एखाद्या पदार्थात वापरण्यात येणारा बेकिंग सोडा मोस घालविण्यात मदत करतो. यासाठी बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा.

Post a Comment

0 Comments