My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

मधुमेहाचे निदान कसे केले जाते.

 

मधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)



मधुमेहाची काय लक्षणे असतात?

अनेकांना असे वाटू शकते की ज्या अर्थी मला मधुमेहाची काही लक्षणे नाहीत त्या अर्थी मला मधुमेह झालेला नाही. पण असे समजणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेतल्यासारखे आहे. मधुमेही व्यक्तीला सुरुवातीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. मग काय करावे? एखाद्याला मधुमेह झालाय की नाही हे कसे ओळखावे? ?

खालील गोष्टींवर लक्ष ठेवा:

  1. तुमच्या घरात/नात्यात कुणाला मधुमेह झालाय का? उदा. आई, वडील, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, आजी, आजोबा वगैरे...
  2. तुमचे वजन वाढले आहे का?
  3. तुमचे वय ३५ पेक्षा अधिक आहे का?
  4. तुमची जीवनशैली बैठी आहे का? व्यायामाचा/कष्टाचा अभाव आहे का?
  5. अलीकडे तुम्हाला खा-खा सुटली आहे का?
  6. तुमच्या जीवनात काही मानसिक ताण-तणाव आहेत का?
  7. अलीकडे तुमची चिड-चिड वाढली आहे का?
  8. विनाकारण थकवा वाटतो का?
  9. जननेंद्रियाला खाज वगैरे येते का (की जी औषधांनी बरी होत नाही)?
  10. शरीराला कुठे जखम/गळू वगैरे आहे का की जे औषधांनी बरे होत नाही?
  11. चष्म्याचा नंबर सतत वाढत चाललाय का?
  12. अंधूक दिसते का? किंवा नजर ठीक नाही का?
  13. घशाला तोंडाला कोरड पडते, किंवा सतत तहान लागते का?
  14. हाता-पायाला मंग्या येतात/बधीरपणा वाटतो का?

वरीलपैकी काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित रक्ताच्या साखरेची तपासणी करून गया.


डायबेटीस टेस्ट :

रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून मधुमेहाचे निदान करण्यासाठी खालिल चाचण्या कराव्या लागतात.
(1) फास्टिंग शुगर टेस्ट
(2) पीपी शुगर टेस्ट

(1) Fasting sugar test (फास्टिंग शुगर टेस्ट) –
यामध्ये उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. ह्या चाचणीसाठी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासण्यापुर्वी किमान 8 तास उपाशी असणे गरजेचे असते.
• रक्तातील साखर 70 ते 99 mg/dL यामध्ये असल्यास नॉर्मल प्रमाण समजले जाते.
• ‎रक्तातील साखर 100 ते 126 mg/dL यामध्ये असल्यास मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबिटीज) असते.
• ‎रक्तातील साखर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.

(2) Post Prandial test (पीपी शुगर टेस्ट) –
भोजन केल्यानंतर ही चाचणी केली जाते.
• जेवणानंतर 140 mg/dL च्या आत रक्तातील साखर असल्यास नॉर्मल प्रमाण समजावे.
• ‎जेवणानंतर 140-200 mg/dL या दरम्यान साखर असल्यास ती मधुमेहाची पूर्वावस्था आहे असे समजावे.
• ‎जेवणानंतर रक्तातील साखर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.

ग्लुकोमीटर आणि डायबेटीस :
डायबेटीसचा त्रास असल्यास साखर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. दरवेळी रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये जाणे योग्य ठरत नाही. यापेक्षा आपण घरच्याघरी ग्लुकोमीटरद्वारे शुगर तपासणी करू शकतो. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

Post a Comment

0 Comments