My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

सीटी स्कॅन – CT Scan तपासणी म्हणजे काय ते जाणून घ्या..

 

सीटी स्कॅन – CT Scan तपासणी म्हणजे काय ते जाणून घ्या..



CT स्कॅन म्हणजे काय..?

म्हणजेच कॉम्प्युटराईज्ड टोमोग्रॉफी. सी.टी. स्कॅन ही रेडिओलॉजीमधील अगदी महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सीटी स्कॅनला कॅट स्कॅन (CAT) कम्प्युटराईज्ड ऍक्सिअल टोमोग्रॉफी देखील म्हणतात.

सीटी स्कॅन हे एक्सरे (क्ष किरण) प्रकारातील ऍडव्हान्स तंत्र आहे. त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या अवयवांबद्दल देखील स्टँडर्ड एक्सरेपेक्षा अधिक खोलवर (डिटेल) माहिती देते. एक्सरे मशिन्स एका जागी स्थिर असतं तर हे सी टी. युनिट आपल्या शरीराभोवती रोटेट होतं म्हणजे फिरतं त्यामुळे शरीराचा जो भाग तपासायचा आहे त्याचे वेगवेगळ्या कोनातून पिक्सर्च घेतल्या जातात.

CT Scan कधी केले जाते,
कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरतात CT स्कॅन करतात..?

सीटी हे अनेक आजाराचं निदान करण्याकरिता महत्त्वाच टूल आहे. त्यामुळे आपण मेंदू, मान, मनका, छाती, पोट, मस्कुलोस्केलेटल सिस्टीम यातील पोटेंशीयल प्रॉब्लेम्सच्या रेंजचे परीक्षण करू शकतो. सीटीमुळे ज्या इमेजेस प्रोव्हाईड केल्या जातात. त्या मेंदूच्या ज्या ऍनॉटामिकल स्लाईसेसशी (3 ते 6 मि. मी. जाड) तुलना करू शकतात.

ज्यात रेडिओडेमीटीतील साधासा फरक देखील टीश्युंमधून ओळखता येतो. जसे सेरेब्रोस्पायनल फ्लुईड, रक्त, व्हाईट व ग्रेमॅटर सीटीस्कॅनमुळे आपल्याला मेंदूतील ट्युमर, रक्तस्राव इनफारक्शन किंवा मालफॉर्मेशन याबद्दलच एक्झॅक्ट लोकेशनचं निदान होण्यात मदत होते. तसेच हायड्रोसिफॅलस (मेंदूत पाणी होणे) सेरेब्रल ऍट्रोफी मेंदूचा आकार कमी होणे किंवा आकुंचन पावणे याचे पण निदान करता येते.

CT Scan करण्यासाठी किती वेळ लागतो..?

सीटी स्कॅनद्वारे परीक्षण व्हायला 15 ते 45 मिनिटे लागतात आणि परीक्षणाच्या आधी जर काही गोष्टींची गरज असेल तर ते आधीच सांगण्यात येतं.

CT Scan करण्यासाठी किती खर्च येतो..?

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या शहरात CT Scan करण्यासाठी साधारण 3000 ते 12000 रुपये खर्च येऊ शकतो.

Post a Comment

0 Comments